AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीच स्पर्श करू दिला असता, पण… सितारा, सुहागरात आणि चाकू… नवा ट्विस्ट काय?

प्रयागराजमधील सितारा आणि कप्तान यांच्या लग्नाची कहाणी सध्या चर्चेत आहे. सिताराने आपल्या पतीवर सुहागरातीच्या दिवशी मारहाण आणि धमक्या देण्याचे आरोप केले आहेत. तसेच कप्तानने आधीच लग्न केले असल्याचा आणि मुलगी असल्याचाही तिने आरोप केला आहे. कप्तानने सितारावर चाकूने हल्ला करण्याची धमकी दिल्याचे आरोप केले होते, तर सिताराने या आरोपांना खोटे ठरवले आहे.

मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीच स्पर्श करू दिला असता, पण... सितारा, सुहागरात आणि चाकू... नवा ट्विस्ट काय?
सितारा, सुहागरात आणि चाकू... त्या रात्री काय घडलं ? Image Credit source: social media
| Updated on: Jun 25, 2025 | 1:41 PM
Share

उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या सितारा आणि कप्तानची कहानी सध्या चर्चेत आहे. सुहागरातीच्या दिवशी चाकू हातात घेऊन नवऱ्याला स्पर्श करण्यास सिताराने मनाई केल्याचं सांगितलं जात आहे. पण सिताराने आता तिचा नवरा कप्तानवरच असंख्य आरोप केले आहेत. सुहागरातीच्या दिवशी मी नाही तर कप्ताननेच चाकू घेतला होता. मी तर पहिल्या रात्रीपासूनच त्याला स्पर्श करायला दिला असता., असं सिताराने म्हटलं आहे. कप्तानने आधीच लग्न केलेलं होतं. त्याला एक मुलगीही आहे, असा गंभीर आरोपही सिताराने केला आहे. सिताराच्या या नव्या दाव्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

सिताराने मीडियाशी संवाद साधताना थेट सांगितलं. मी त्याला कधीच मना केलं नाही. मी चाकू उचलला नाही. चाकू त्याच्याकडेच होता. त्याने मला घाबरवलं. लग्नाच्या काही तासातच त्याचं लग्न झालेलं असल्याचं मला कळलं. त्याला एक मुलगी असल्याचंही मला समजलं. त्याने मला फसवलं. जी महिला कप्तानची बायको असल्याचं सांगत होती, तिच्याशी त्याने माझं बोलणंही करून दिलं, असं सितारा म्हणाली.

सुहागरातीच्या दिवशी मी त्याच्यासोबत खोलीत गेले. त्यावेळी त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याला स्पर्श केला तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी मला त्याच्या बायकोने दिली होती. त्याच रात्री माझा फोन हिसकावून घेतला गेला. मला कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. मला वारंवार अपमानित केलं गेलं. मारलं गेलं. धमकावलं गेलं आणि माझ्यावरच खोटे आरोप लावले, असा आरोपही सिताराने केला.

कोण अमन? मी नाही ओळखत

अमन हा सिताराचा कथित प्रेमी असल्याचं सांगितलं जात आहे. पण सिताराने आपला प्रियकर असल्याचं नाकारलं आहे. मी कोणत्याच अमनला ओळखत नाही. त्याच्याशी माझं काय नातं आहे हे मला माहीत नाही. अमन तर कप्तानचा मित्र आहे. मला फसवण्यासाठी त्याचं नाव घेतलं जात आहे. मी प्रेमीसोबत पळून गेले नव्हते. तर माझा जीव वाचवण्यासाठी घरातून पळून गेले होते. मी खांबावरून उतरून पळाल्याचं त्या लोकांनी सांगितलं. खरं तर मी लंगडत जीव वाचवत पळाले. तो मला धमकावत होता. मी विरोध केला आणि कुणाला काही सांगितलं तर माझ्या वडिलांना त्रास दिला जाईल आणि मला जीवे मारलं जाईल अशी मला धमकी देण्यात आली होती, असंही ती म्हणाली.

मग मी कुणाशी कसं बोलणार?

माझा फोन हिसकावून घेण्यात आला होता. त्यामुळे मी कुणाशी कशी बोलणार? हे सर्व खोटे आरोप आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे, असंही तिने सांगितलं.

कप्तानचे आरोप काय?

यापूर्वी कप्तानने सितारावर गंभीर आरोप केले होते. लग्नानंतर सितारा रोज रात्री चाकू उशाखाली ठेवून झोपायची. माझ्या जवळ आला तर चाकूने हल्ला करेल अशी धमकी तिने मला दिली होती, असं कप्तानने म्हटलं होतं. एकदा सिताराच्या व्हॉट्सअप चॅटची मला माहिती मिळाली. त्यात सिताराचा कथित प्रेमी अमनने मला मारण्याबाबत म्हटलं होतं. कप्तान काही बोलला तर 10-20 मुले आणून त्याला मारू, असं या चॅटमध्ये म्हटलं होतं, असा दावा कप्तानने केला होता.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.