Raja Raghuvanshi Murder : राजा नव्हे मयंक असता सोनमची शिकार… ‘त्या’ सल्ल्यामुळे थोडक्यात वाचला जीव

राजा रघुवंशीच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण देश हादरला असून सगळीकडे हे प्रकरण गाजतयं. लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांच्या आतचं राजाचाी निर्घृण हत्या झाली आणि त्याचं प्लानिंग त्याच्या बायकोने केलं होतं. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Raja Raghuvanshi Murder : राजा नव्हे मयंक असता सोनमची शिकार... त्या सल्ल्यामुळे थोडक्यात वाचला जीव
raja raghuvanshi
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 18, 2025 | 10:17 AM

इंदौरचा राजा रघुवंशी याची लग्नांतर अवघ्या 15 दिवसांच्या आतच निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नव्हे तर त्याची स्वत:ची पत्नी, सोनम हीच होती. राजा आणि सोनम हनीमूनला गेले असतानाच सोनमने प्लानिंग करून राजाची हत्या घडवून आणली आणि त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आला. याप्रकरणात सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह तीन मारेकरी अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून राजाच्या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.

आता याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या केसशी आता धारचं नातंही जोडलं गेलं आहे. पतीची हत्या घडवणारी सोनम रघुवंशी हिचं लग्न राजाच्या आधी धारमधल्या तरूणाशी होणार होतं. धार येथील उद्योजकाच्या मुलाचं स्थळ हे सोनमसाठी आलं होतं. मात्र तेवढ्यात असं काही घडलं की हे नातंच मोडल. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया…

राजा रघुवंशीच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या गुन्ह्यातील नराधम आरोपींना शिक्षा कधी होईल याचीच प्रत्येकजण वाट पाहत आहे. परंतु मेघालय पोलिस अजूनही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच दरम्यान, आरोपी पत्नी सोनमबद्दल एक नवीन खुलासा झाला आहे. सोनम आधी राजाशी नव्हे तर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार होती, असे उघड झाले आहे. तिचा होणार नवरा हा धार जिल्ह्यातील रहिवासी होता. परंतु काही कारणांमुळे वराच्या बाजूने नातं तोडण्यात आलं.

दुसऱ्याशी होणार होतं लग्न पण..

मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी सोनमच्या लग्नासाठी धार येथील नाणेवाडी येथील व्यापारी हरीश रघुवंशी यांचा मुलगा मयंक रघुवंशी याच्या लग्नाचा प्रस्ताव आला होता. मयंकच्या मामाच्या कुटुंबाकडून हा प्रस्ताव आला होता. त्याच्या नातेवाईकांनी सोनमचं स्थळ हे त्याच्या मामाच्या कुटुंबाला पाठवलं होतं. जेव्हा लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा दोघांचेही गुण जुळतात का हे पाहण्यात आलं. तेव्हाच सोनम आणि मयंकचे 25 गुण जुळत होते.

ज्योतिषाचा सल्ला ऐकला आणि तोडलं नातं

सोनम आणि मयंकचे 25 गुण जुळल्यानंतर, मयंकच्या कुटुंबातील सदस्ये हे ज्योतिषाशी बोलले. मात्र तेव्हा ज्योतिषाने जे सांगितलं ते ऐकून सगळे हैराण झाले. हे नातं जास्त काळ टिकणार नाही. हे लग्न झाल्यास त्यांना (मयंक आणि कुटुंबियांना) गंभीर परिस्थितीत टाकू शकते, असा इशारा ज्योतिषाने दिला होता. ते ऐकून मयंकच्या कुटुंबाने सोनमच स्थळ नाकारलं आणि लग्न करण्यास नकार दिला.

देवाचे मानले आभार

त्यानंतर धार येथील रघुवंशी कुटुंबाला जेव्हा राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणि त्यातल सोनम रघुवंशीचा सहभाग असल्याचं कळलं तेव्हा ते हादरलेच पण त्यांनी देवाचे आभार मानले. लग्नाचं स्थळ आलं तेव्हा त्या ज्योतिषाने त्यांना वेळीच इशारा देऊन वाचवलं. जर सोनमने मयंकशी लग्न केले असते, तर सोनम ही राजाऐवजी मयंकला लक्ष्य करू शकली असती.