तो भररात्री पोलिसांकडे गेला, म्हणतो बायको अन् बॉयफ्रेंड दोघेही…; घटनास्थळी जाताच पोलिसही चक्रावले!
एका तरुणाने भररात्री पोलीस ठाण्यात जाऊन धक्कादायक माहिती दिली आहे. या माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले.

Crime News : पती-पत्नी हे नातं फारच पवित्र असतं. आयुष्यात शेवटपर्यंत हे दोघेच एकमेकांचे हक्काचे साथीदार असतात. मात्र याच नात्यात कधीकधी वितुष्ट येतं. काही ठिकाणी तर पत्नी-पत्नीच्या या नात्यात अन्य एखाद्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याने मोठा कलह निर्माण होतो. कधीकधी तर एकमेकांसोबत लग्न केलेलं असलं तरी या दोघांतील एकाचा जीव दुसऱ्याच व्यक्तीवर जडतो. यातून मात्र अनेकदा खुनासारखे गंभीर प्रकार घडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बायको बॉयफ्रेंडला बोलत असल्याचे समजताच त्यानं तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं आहे. हे कृत्य पाहून खुद्द पोलीसही चक्रावून गेले आहेत.
नेमकं काय घडलं?
ही घटना पश्चिम बंगालमधील दक्षिण 23 या भागातील आहे. येथे एक तरुण भररात्री थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन मी माझ्या बायकोची हत्या केली आहे, असं सांगितलंय. गेल्या सहा वर्षांपासून माझी बायको आणि शेजारच्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे दोघे मिळून माझी हत्या करणार होते. त्यामुळे माझी बायको काही करण्याआधी मीच तिला मारून टाकले असे, या तरुणाने सांगितले आहे.
तरुणाने पोलीस ठाण्यात ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाने त्याच्या बायकोची गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
कधीपासून चालू होतं अफेअर?
हत्या झालेल्या महिलेचे नाव प्रियांका गायेन असे आहे. तर तिच्या आरोपी पतीचे नाव बापी गायेन असे आहे. याद दोघांचेही आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाआधी प्रियांका आणि बापी यांची घरं एकमेकांच्या जवळच होती. या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. लग्न झाल्यानमंतर बापी पार्क सर्कसच्या एका कंपनीत नोकरीला जायचा. प्रियांका आणि बापी हे दोघेही सोनारपूर येथील माहीनगरात किरायाने रूम करून राहायचे. त्यांच्या याच घराच्या बाजूला सुप्रकाश दास नावाचा एक तरुण आणि त्याची पत्नी राहायचे. सुप्रकाश आणि प्रियांका यांच्यात अगोदर ओळख झाली आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, असा दावा बापी याने केला आहे.
..तो पुन्हा शेजारी राहायला आला
त्यांच्या प्रेमाची बापीला माहिती मिळाल्यानंतर बापी आणि प्रियांका यांच्यात भांडण होऊ लागले. सुप्रकाशपासून सुटका व्हावी म्हणून बापीने त्याची रुम बदलली. मात्र नंतर सुप्रकाश आमच्या घराजवळच राहायला आल्याचे बापीला समजले. तसेच बापी आणि प्रियांका अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत, असा संशयही त्याला आला. त्यानंतर मात्र बापीच्या मनातील राग उफाळून आला. प्रियांका आणि सुप्रकाश हे दोघेही माझ्या हत्येचा कट रचत होते, असा आरोप बापीने केला आहे.
प्रियांकाल कसं संपवलं?
मात्र ही हत्या करण्याआधीच बापीने त्याची पत्नी प्रियांकाचा काटा काढलाय. प्रियांका रात्री झोपेत असतानाच बापीने तिचा गला दाबला आहे. बापीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने सोनारपूर पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
