
राजस्थानच्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईच्या निधनानंतर तिच्या चांदीच्या कड्यांसाठी तिच्या मुलांमध्ये वाद झाला. या घटनेत तर मर्यादा तेव्हा ओलांडल्या जेव्हा एका मुलाने आपल्या आईच्या चितेवर झोपून अंत्यसंस्कारापूर्वी चांदीचे कडे मागण्याचा हट्ट धरला.
आईच्या अंत्यसंस्कारात मालमत्तेचा वाद
या लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ ३ मे २०२५ पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मानवी संवेदनांना हादरवून सोडणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. तिच्या सात मुलांच्या कुटुंबात यापूर्वीच मालमत्तेवरून वाद सुरू होते. अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान स्मशानात मुलांमध्ये आणि नातवांमध्ये वाद सुरू झाला. जेव्हा एक मुलगा आणि नातू थेट महिलेच्या मृतदेहावर बसले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यांनी अट घातली की, जोपर्यंत आईचे चांदीचे कडे मिळणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाहीत. आईचे शव जमिनीवर पडले होते, पण मुलांच्या लालसेने मानवतेला काळिमा फासला.
वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…
ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतरही तणावपूर्ण वातावरण
स्थानिक लोक आणि नातेवाईकांनी तासन् तास मुलांना आणि नातवांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुले आपल्या हट्टावर ठाम राहिली. या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. मृतदेहावर वारंवार झोपणे आणि बसण्याचा हा प्रकार पाहून लोकांना धक्का बसला. बराच वेळ गेल्यानंतर कसेबसे प्रकरण शांत झाले आणि अंत्यसंस्कार पार पडले.