AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Suicide : नवी मुंबईत पाचवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

मयत मुलगी नवी मुंबईतील रबाळे येथील रहिवासी असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. गेले काही दिवस मुलगी शांत राहत होती. मैत्रिणींशीही बोलत नव्हती, अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिली.

Navi Mumbai Suicide : नवी मुंबईत पाचवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
नवी मुंबईत पाचवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 6:23 PM
Share

नवी मुंबई : अज्ञात कारणावरुन पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनी (Student)ने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नवी मुंबईतील रबाळे येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस (Rabale Police) ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलीला एका मुलाकडून धमकी मिळत होती. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहेत. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.

पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल

मयत मुलगी नवी मुंबईतील रबाळे येथील रहिवासी असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. गेले काही दिवस मुलगी शांत राहत होती. मैत्रिणींशीही बोलत नव्हती, अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिली. परिसरात राहणाऱ्या एक मुलगा काही कारणावरुन धमकावत होता, अशी माहिती मिळते. हा मुलगाही तिच्याच वयाचा आहे. याच कारणातून मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. हा मुलगा नेमका कोण आहे ? तो कसली धमकी मुलीला देत होता ? याबाबत रबाळे पोलीस तपास करत आहेत. तपासाअंतीच मुलीच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र शाळकरी मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

औरंगाबादमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

अज्ञात कारणावरुन औरंगाबादमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. औरंगाबादमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. तीन दोघांचेही मृतदेह हॉटेलच्या रुममध्ये पडून होते. मृतदेहांना वास येऊ लागल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा खोलून पाहिला असता दोघे जण मृतावस्थेत आढळले. टीव्हीचा आवाज मोठा करुन दोघांनी आत्महत्या केली. प्रियकर फॅनला लटकला होता तर प्रेयसीचा मृतदेह पलंगावर पडला होता. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. (Suicide of 5th class student due to unknown reason in Navi Mumbai)

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.