सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरण, अटकेतील ड्रग पेडलरची पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी

साहिल शाह दुबईत बसून आपल्या पेडलरच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री करत होता. मात्र त्याच्याच दोन पेडलर्सना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. (Drug Peddler DYSP exams)

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरण, अटकेतील ड्रग पेडलरची पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 7:39 AM

मुंबई : बहुचर्चित सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचं (Sushant Singh Rajput Drugs Case) दुबई कनेक्शन उघडकीस आलं आहे. जवळपास 6 ते 7 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य संशयित आरोपीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ओळख पटवली आहे. हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको (Sahil Shah alias Flacko) दुबईत लपून बसला आहे. धक्कादायक म्हणजे अटकेतील दोन ड्रग्ज पेडलरपैकी एक जण DYSP म्हणजे पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी करत होता. (Sushant Singh Rajput Drugs Case arrested Drug Peddler reportedly preparing for DYSP exams)

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीने सोमवारी रात्री छापेमारी केली. सुशांत पूर्वी राहत असलेल्या मालाड भागातील इंटरफेस हाईटच्या E विंगमध्ये छापा टाकला होता. यावेळी साहिल शाहची ओळख पटली. घरात त्याची आई आणि एक महिला होती. साहिल घरात राहत नाही, बाहेर असतो. फक्त फोन किंवा व्हॉट्सअॅप कॉलवर संपर्कात राहतो, असं त्यांनी सांगितलं. या धाडीमध्ये साहिलच्या घरातून क्युरेटेड नार्दन अमेरिकन बड्स जप्त करण्यात आल्या.

कसा लागला साहिल उर्फ फ्लाकोचा शोध?

सुशांत प्रकरणात काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज पेडलर अब्बास आणि जैद यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान साहिलचे नाव समोर आले होते. तेव्हापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो साहिलच्या मागावर आहे. परंतु आजपर्यंत तो सापडला नाही, त्याच शोध सुरुच आहे.

कोण आहे साहिल शाह?

साहिल शाह उर्फ फ्लाको हा मालाडच्या इंटरफेस हाईट्स इमारतीमधला रहिवासी आहे. याच इमारतीत सुशांत सिंग राजपूत पूर्वी राहत होता. साहिल शाह गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आतापर्यंत मारामारी, धमकावणे अशा अनेक केसेस आहेत. मात्र तो दुबईला पळून गेल्याची माहिती असून तिथूनच आपला ड्रग्जचा कारभार संचालित करत असल्याचं समजतं.

काय होती साहिलची मोडस ऑपरेंडी?

साहिल शाह उर्फ फ्लाको या आरोपीबाबत म्हटलं जातं की तो कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. त्याच्या कुठल्याही ड्रग पेडलरने त्याला आजतागायत पाहिलेले नाही. ड्रग्जची ऑर्डर मिळाल्यानंतर तो एके ठिकाणी ड्रग्जची पॅकेट्स जमा करतो. नंतर त्याच्या पेडलर्सला ती कलेक्ट करायला सांगतो. जेव्हा एका पेडलरकडे कोणी ग्राहक येतो, तेव्हा तो पेडलरला आधी व्हिडीओ कॅमरा सुरु करायला सांगत असे. 360 डिग्री म्हणजे चहूबाजूना व्हिडीओ कॅमेराने बघून जेव्हा सर्वकाही आलबेल असल्याची खात्री त्याला पटते, तेव्हा तो कस्टमरला ड्रग्ज द्यायला सांगत होता. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहिल पेडलर आणि ग्राहकाला बघत असे, मात्र स्वतःचा कॅमेरा तो कायम बंद ठेवायचा, जेणेकरुन त्याला कोणीही बघू नये. (Sushant Singh Rajput Drugs Case arrested Drug Peddler reportedly preparing for DYSP exams)

अटकेतील पेडलरची पोलिस भरतीसाठी तयारी

साहिल दुबईत बसून आपल्या पेडलरच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री करत होता. मात्र त्याच्याच दोन पेडलर्सना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघा ड्रग पेडलर्सपैकी एक जण DYSP म्हणजे पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी करत होता. त्याचं नाव गणेश शोरे असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचं नाव सिद्धार्थ आहे. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ शाह उर्फ फ्लाको कधी सापडेल?

एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे साहिलची संपूर्ण ओळख पटली आहे. त्याचबरोबर त्याचे बँक अकाऊंट, पासपोर्ट डिटेल आणि आवश्यक सर्व माहिती एनसीबीला मिळाली आहे. लवकरच त्याला अटक करण्याचा प्रयत्म एनसीबी अधिकारी करत आहेत. साहिल हा सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी आहे. त्याला अटक झाली की सुशांत प्रकरणात अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत, पण सूत्रधार साहिल शाहाचा चेहराच पेडलर्सना माहिती नाही

(Sushant Singh Rajput Drugs Case arrested Drug Peddler reportedly preparing for DYSP exams)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....