बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा डीवायएसपींवर गोळीबार, नगरमध्ये थरार

गोळीबार करणारा पुण्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोप करणाऱ्या महिलेला धमकावण्यासाठी सुनील लोखंडे आला होता.

बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा डीवायएसपींवर गोळीबार, नगरमध्ये थरार
suspended Police officer fires on DYSP
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 2:09 PM

अहमदनगर : बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून डीवायएसपींवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या गोळीबारानंतर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके सुदैवाने बचावले आहेत. बडतर्फ अधिकारी सुनील लोखंडे आणि DYSP यांच्या झटापटीत गोळीबार झाला.

गोळीबार करणारा पुण्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याला ताब्यात घेण्यात आलं आहे.  आरोप करणाऱ्या एका महिलेला धमकावण्यासाठी सुनील लोखंडे आला होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर झालेल्या झटापटीत हा गोळीबार झाला.

पीडित महिलेच्या घरात मुलांना डांबून ठेवल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या सर्व थरारात सुनील लोखंडेने थेट डीवायएसपींवर गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सुनील लोखंडे हा पुणे पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता होता. मात्र त्यांच्याविरोधात एका महिलेने  तक्रार दिली होती. याप्रकरणी सुनील लोखंडे यांच्यावर नगर जिल्ह्यातील राहुरी इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने चिडलेल्या सुनील लोखंडे यांनी महिलेला धमक्या दिल्याचा आरोप आहे.

सुनील लोखंडे यांच्याविरुद्ध राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर यासंदर्भात पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात होती. त्यामुळे आज सकाळी लोखंडे पीडित महिलेच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर पीडित महिला आणि तिच्या २ मुलींवर ताणल्याचाही दावा करण्यात येत आहे.

पोलीस फौजफाटा दारात

यासंदर्भात माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे आपल्या फौजफाट्यासह पीडितेच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडेने हवेत 1 गोळी देखील झाडली. त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बडतर्फ पोलीस लोखंडेने बंदुकीच्या निशाण्यावर धरलेल्या मुलांना, त्याच्या ताब्यातून सुखरूप बाजूला केले.

त्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी बडतर्फ पोलीस लोखंडे यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन, पुढील कारवाईकरिता राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. बडतर्फ पोलीस अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या  

होय, माझ्याही कंपन्यांवर आयकरने धाडी टाकल्या : अजित पवार

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.