AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डचा संशयास्पद मृत्यू, नेमके काय घडले?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डचा संशयास्पद मृत्यू, नेमके काय घडले?
घरात दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले तर...Image Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 29, 2023 | 2:05 PM
Share

ठाणे / निखिल चव्हाण : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाणे येथे उघडकीस आली आहे. आव्हाड यांच्या बॉडीगार्डच्या निधनाने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अनंत करमुसे प्रकरणी आव्हाड यांचा हा बॉडीगार्ड आरोपी होता. सध्या ठाणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु होती. याच प्रकरणामुळे दबावातून त्याने जीवन संपवल्याची माहिती कळते. मृत्यूपूर्वी बॉडीगार्डने सोशल मीडियावर मी अपराधी नसल्याची पोस्ट केली होती. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

काय आहे करमुसे प्रकरण?

स्थापत्य अभियंता आणि भाजपचा कार्यकर्ता असलेला अनंत करमुसे याने महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे याला आव्हाड यांच्या बंगल्यात आणून बेदम मारहाण केली होती. बंगल्यात अनेक जणांनी पोलिसांकडील फायबर काठी तुटेपर्यत मारहाण केली. काठी तुटल्यावर वेताचा बांबू, लोखंडी पाईप आणि कंबरेच्या पट्ट्याने चक्कर येईपर्यंत मारहाण केली. मारहाण होत असताना स्वतः जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.

बेदम मारहाण केल्यानंतर करमुसे याला फेसबुकवरील ती पोस्ट डिलीट करायला लावली. नंतर ही पोस्ट चुकून पोस्ट केली, त्याबद्दल माफी मागतो, असा व्हिडिओ त्याच्याकडून रेकॉर्ड करुन घेतल्याचे करमुसे याने जबाबात म्हटले होते. यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर सर्वांची सुटकाही झाली होती.

यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर ही केस पुन्हा ओपन करण्यात आली. या केसमधील सर्व आरोपींची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. या आरोपींमध्ये आव्हाड यांच्या या बॉडीगार्डचाही समावेश असून, त्याचीही ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ही चौकशी सुरु असतानाच बॉडीगार्डने जीवन संपवल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?