Jalgaon Crime : काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली ती परतलीच नाही, तीन दिवसांनी थेट मृतदेह आढळला !

काकाच्या घरी टीव्ही पहायला गेलेली मुलगी घरी परतत होती. मात्र घरी पोहचलीच नाही. मग तीन दिवसांनी जे समोर आलं त्याने संपूर्ण गाव हादरला.

Jalgaon Crime : काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली ती परतलीच नाही, तीन दिवसांनी थेट मृतदेह आढळला !
जळगावमध्ये 8 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 4:15 PM

खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी, जळगाव / 2 ऑगस्ट 2023 : जळगावातील भडगाव तालुक्यात एक धक्दादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. काकाच्या टीव्ही पहायला गेलेली 8 वर्षाची पुन्हा घरी परतलीच नाही. तीन दिवसापासून मुलगी बेपत्ता होती. मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. मात्र मुलगी कुठेच आढळून आली नाही. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात चाऱ्याखाली सापडला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला? हे अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. भडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

काकाकडून घरी जेवायला येत होती, पण पोहचलीच नाही

पीडित मुलगी रविवारी आपल्या काकाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. काकाच्या घरातून दुपारी जेवणासाठी आपल्या घरी येण्यासाठी निघाली. मात्र ती घरी पोहचलीच नाही. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने आई-वडिलांनी शोध सुरु केला. मात्र मुलीचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आई-वडिलांनी सायंकाळी भडगाव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रा दाखल केली.

गोठ्यात आढळला मुलीचा मृतदेह

पोलीसही मुलीचा शोध घेत होते. अखेर हा शोध थांबला, पण जे समोर आलं ते पाहून आई-वडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या अशा रहस्यमयरित्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाहणी करत पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.