दोघांची शेवटची भेट…तिचं दुसऱ्याशी लग्न जमलेलं…आता मी जगून काय करू म्हणत… त्याने तिचीच ओढनी घेऊन…

मृत प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आज सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले होते.

दोघांची शेवटची भेट...तिचं दुसऱ्याशी लग्न जमलेलं...आता मी जगून काय करू म्हणत... त्याने तिचीच ओढनी घेऊन...
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 9:29 PM

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : प्रेमात तरुण-तरुणी ( Boyfriend Girlfriend ) काय करतील याचा काही नेम नसतो. कुणी फसवून निघून जात तर कुणी प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार होतात. मात्र पुण्यातील एका घटनेने चर्चेला उधाण आले आहे. ( Pune Crime News) प्रियकराने केलेले कृत्य ऐकून अनेक जण हळहळ व्यक्त करताय, तर अनेक जण त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचं झालं असे की, पुण्यातील एका लॉजमध्ये प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने पुण्यामध्ये खळबळ उडाली असून जोरदार चर्चा सुरू आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर ही धक्कादायक घटना घडली आहे. साकीब लतीफ इनामदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मृत प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आज सकाळी साडेदहा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले.

तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. प्रेयसीचे लग्न जमल्यानंतर त्या दोघांची शेवटची भेट होती.

काही दिवसांनीच प्रेयसीचा विवाह होणार होता. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी जगून तरी काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

ही बाब पोलीसांना कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हवेली पोलीस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.