AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्काराचा आरोप, जेलवारी, मग कुटुंबासह टोकाचा निर्णय, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

सकाळी बराच वेळ झाला तरी मुलगा आणि सून उठले नाहीत. आईने दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद आला नाही. तिने शेजाऱ्यांना बोलावले आणि दरवाजा तोडून पाहिले तर धक्काच बसला.

बलात्काराचा आरोप, जेलवारी, मग कुटुंबासह टोकाचा निर्णय, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
शिंदे कुटुंबीयांच्या आत्महत्येप्रकरणी माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला अटकImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 24, 2023 | 2:21 PM
Share

कोल्हापूर : पुण्यात डॉक्टरच्या फॅमिलीच्या मृत्यू प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात उद्योगपतीच्या कौटुंबिक आत्महत्येचं प्रकरण उघडकीस आलं आहे. बलात्काराच्या खोट्या आरोपानंतर उद्योगपती प्रचंड तणावात होते. याच तणावातून त्यांनी कुटुंबासह टोकाचा निर्णय घेतला. सकाळी त्यांची आई त्यांना उठवायला गेली असता ही घटना उघडकीस आली. कुटुंबाने विषारी औषध पिऊन जीवन संपवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे गडहिंग्लज शहरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे असे मयत उद्योगपतीचे नाव आहे. तरुण उद्योगपतीच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

गडहिंग्लज शहरातील उद्योगपती संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे त्यांना जवळपास महिनाभर तुरुंगात रहावे लागले होते. तुरंगातून बाहेर आल्यानंतर ते सर्व विसरुन नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना प्रचंड मानसिक तणावही होता.

नेहमीची उठण्याची वेळ झाली तरी शिंदे उठले नाहीत. यामुळे त्यांची आई दरवाजा ठोठावायला गेली. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. मग त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता बेडरुममध्ये शिंदे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे मृतदेह आढळले. तिघांच्याही मानेवर जखमा आढळल्या.

शेजाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. विषारी औषध प्राशन करुन मग गळ्यावर वार करुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान