सोन्याच्या भावात मिळणाऱ्या लाकडाची ‘अशी’ व्हायची तस्करी, वनविभागाच्या कारवाईने ‘पुष्पा’ चा झाला भांडाफोड

महागड्या वाहनांमधून होणारी तस्करी उघडकीस येत असल्याने लाकूड तस्करांनी नवी शक्कल लढवली होती, वनविभागाच्या कारवाईनंतर लाकूड तस्करांचा भांडाफोड झाला आहे.

सोन्याच्या भावात मिळणाऱ्या लाकडाची 'अशी' व्हायची तस्करी, वनविभागाच्या कारवाईने 'पुष्पा' चा झाला भांडाफोड
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 9:21 AM

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार : सोन्याच्या भावात विकलं जाणारं लाकूड म्हणजे सागवान झाडाचं लाकूड. फर्निचर बनविण्यासाठी आणि महागडे लाकूड म्हणून सागवानची ओळख आहे. मोठी मागणी सागवानच्या लाकडाला असते. त्यामुळे सागवान लाकडाची तस्करी होण्याचे प्रमाण हळूहळू वाढतच चाललं आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्यामध्ये दोन्ही राज्याच्या सीमा भागाचा फायदा उचलत काही तस्कर जंगलातील महागड्या सागवान झाडांची तस्करी करत आहे. पुष्पा चित्रपटाला साजेशी तस्करी येथील जंगलात सुरू आहे. दिवसेंदिवस जंगलातील सागवान, खैर अशा झाडांची झालेली संख्या पाहून वनविभागाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तस्करांवर कारवाई केली जात आहे. अशीच एक मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. यामध्ये थेट लाकूडचं जमिनीत पुरून ठेवल्याचे समोर आले आहे. त्यासाठी चक्क जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत लपून ठेवलेले लाकूड बाहेर काढण्यात आले आहे.

फर्निचर बनवण्यासाठी आणि इतर कामांसाठी सागवान लाकूड मौल्यवान समजले जाते सागवान लाकडाला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने नवापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात लाकडांची बेकायदेशीर तोड होत असते.

लाकूड तस्कर गुजरात आणि महाराष्ट्र सीमा वरती भागात मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी करत असल्याने वन विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे नवनवीन युक्त्या समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा

महागड्या गाड्यांमधून होणारी तस्करी उघडकीस आली होतीतर वन तस्करांनी कमालच केली आहे. तस्करी केलेले सागवानी लाकूड जमिनीत पुरून ठेवले होते.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार परिसरात तपासणी केली असता जमिनीत पुरून ठेवलेला मोठा लाकूड साठा हाती लागला आहे.

लाकडांची साईज मोठी असल्याने जमिनीत पुरून ठेवलेल्या लाकूड साठा बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जेसीबी ची मदत घ्यावी लागली आहे.

वन विभागाच्या कारवाईच्या धडाक्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे नवापूर वन विभागाच्या अधिकारी स्नेहल अवसलमल आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.