AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : मित्रांमधील वाद टोकाला गेला, तिघांनी मिळून तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला !

या पार्टीत दारू प्यायल्यानंतर चौघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादातून सोनू करण आणि सुरेंद्र यांनी संजय कुमार याला बेदम मारहाण सुरू केली.

Dombivali Crime : मित्रांमधील वाद टोकाला गेला, तिघांनी मिळून तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला !
डोंबिवलीत वैयक्तिक वादातून तरुणाला मारहाणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 5:32 PM
Share

डोंबिवली : मित्रांमध्ये झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, तिघांनी मिळून तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला. डोंबिवलीतील गोळवली परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. संजय कुमार असे जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाला मुंबईतील एका पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र राम, सोनू राम आणि करण राम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जखमी तरुण आणि आरोपी एकाच खोलीत राहतात

डोंबिवलीमधील गोळवली परिसरात संजय कुमार, सोनू राम, करण राम आणि सुरेंद्र राम हे चार जण एमआयडीसीमध्ये काम करत असून,एकाच खोलीत राहत होते. काल रात्रीचा सुमारास या चौघांनी पार्टी केली.

काही कारणातून झालेला वाद विकोपाला गेला अन्…

या पार्टीत दारू प्यायल्यानंतर चौघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादातून सोनू करण आणि सुरेंद्र यांनी संजय कुमार याला बेदम मारहाण सुरू केली.

इतकेच नव्हे तर या तिघांनी धारदार शस्त्राने संजय कुमार याचा प्रायव्हेट पार्टच कापला. या हल्ल्यात संजय कुमार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी तरुणावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

जखमी संजय कुमारला उपचारासाठी मुंबई येथील पालिका रुग्णालयात हलवले. तसेच या तिघांवर गुन्हा दाखल करत, यापैकी सोनू राम आणि करण राम या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान या चौघांमध्ये वैयक्तिक कारणातून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गोला. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच वादाचे नेमके कारण उघड होईल.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.