AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Murder : पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा गळा चिरला, हत्येनंतर मित्रांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेह दाखवला

पोलीस तपासात समोर आले की, वृद्ध महिलेने मालमत्ता विकून सर्व मुलांना कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक केले होते आणि ती शालिमार बाग परिसरात एकटीच राहत होती.

Delhi Murder : पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा गळा चिरला, हत्येनंतर मित्रांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेह दाखवला
पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा गळा चिरलाImage Credit source: tv9
| Updated on: Jul 10, 2022 | 11:44 PM
Share

दिल्ली : पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने धक्काबुक्की करुन 84 वर्षीय आजीची गळा चिरुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात घडली आहे. सर्जिकल ब्लेडने गळ्यावर वार करुन आजीची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने व्हिडिओ कॉल (Video Call) करुन मित्रांना मृतदेह दाखवून हत्येची पुष्टी केली. आजीच्या हत्येनंतर घरातील पैसे लुटून आरोपी पळून गेला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांचाही समावेश होता, त्यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी सर्जिकल ब्लेड, रक्ताने माखलेले कपडे, लुटलेले 50 हजार रुपये, स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी शालीमार बाग परिसरात एका 84 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासात समोर आले की, वृद्ध महिलेने मालमत्ता विकून सर्व मुलांना कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक केले होते आणि ती शालिमार बाग परिसरात एकटीच राहत होती. पोलिसांनी मुलांची चौकशी केली, मात्र कुणावरही संशय आला नाही. हत्येप्रकरणी पोलिसांना कोणताही धागादोरा हाती लगात नव्हता.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी

पोलिसांनी महिलेच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही स्कॅन केले. यामध्ये एक संशयित मुलगा पांढऱ्या टॉवेलने चेहरा झाकून हत्येच्या आदल्या रात्री 9.30 वाजता महिलेच्या घरात शिरताना दिसला. यानंतर तो रात्री 11.20 वाजता बाहेर येताना दिसला. यानंतर तो पुन्हा रात्री 12.20 वाजता घरात शिरताना दिसला आणि काही वेळाने निघून गेला. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संशयित कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दाखवला. कुटुंबीयांनी संशयिताची ओळख सांगताच पोलिसही चक्रावून गेले. तपासादरम्यान संशयित हा दुसरा तिसरा कोणी नसून वृद्ध महिलेचा नातू असल्याचे निष्पन्न झाले.

उधार पैसे परत करण्यासाठी हत्या करुन पैसे लुटले

पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. शाळेत शिकत असताना चुकीच्या संगतीत पडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्याची चार तरुणांशी मैत्री झाली. मुलाने या तरुणांकडून पैसे उधार घेतले होते. हे पैसे ते परत मागत होते. मात्र मुलाकडे पैसे नव्हते. अल्पवयीन मुलाने चौघांना सांगितले की, त्याच्याकडे पैसे नाहीत, परंतु त्याची आजी एकटी राहते आणि नुकतीच तिने मालमत्ता विकली आहे. त्यामुळे तिच्याकडे पैसे आहेत आणि ती पैसे देऊ शकते. जर तिने पैसे दिले नाहीत तर तिला मारून घरातून मोठी रक्कम मिळू शकते.

हत्येनंतर व्हिडिओ कॉल करुन मित्रांना मृतदेह दाखवला

सगळ्यांनी मिळून एक कट रचला. अल्पवयीन मुलाने आजीचे घर गाठून तिच्याकडे पैसे मागितले. आजीने नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने आजीला धक्काबुक्की करत तिचा गळा चिरून खून करण्यात आला. हत्येनंतर मित्रांनी व्हिडिओ कॉलवर मृतदेह दाखवून हत्येची पुष्टी केली. नंतर मित्रांना बोलावून एका ठिकाणी बोलावून आजीच्या घरातून लुटलेले सुमारे 1 लाख 50 हजार रुपये देऊन कर्जाची परतफेड केली. यानंतर अल्पवयीन मुलगा पुन्हा आजीच्या घरी गेला आणि आजी जिवंत आहे का ते पाहिले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या मित्रांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. (The minor grandson killed the grandmother for money in delhi)

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.