Amravati Killing : अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरण, दहशत पसरवण्याचा कट, इंटरनॅशनल लिंक; जाणून घ्या NIA च्या FIR मध्ये काय म्हटलंय

आरोपींचे कोल्हे यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नसून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अन्यत्रही असाच गुन्हा घडल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Amravati Killing : अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरण, दहशत पसरवण्याचा कट, इंटरनॅशनल लिंक; जाणून घ्या NIA च्या FIR मध्ये काय म्हटलंय
उमेश कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 9:05 PM

अमरावती : अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी एनआयए (NIA)ने एफआयआर दाखल केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या हा एका मोठ्या कटाचा भाग होता. भारतातील लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्याचा कट रचला होता, असे या एफआयआर (FIR)मध्ये म्हटले आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हेंच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते, असे एनआयएने म्हटले आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर, विशेष एनआयए न्यायालयाने सात आरोपींना 15 जुलैपर्यंत एनआयए कोठडीत पाठवले.

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी 2 जुलै रोजी, एनआयएने बेकायदेशीर क्रियाकल्प (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम 16, 18 आणि 20 अंतर्गत पुन्हा गुन्हा नोंदवला. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी मृताचा मुलगा संकेत उमेश कोल्हे यांच्या फिर्यादीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान उघड झालेल्या तथ्यांनुसार, आयपीसीचे कलम 153 (अ), 153 (बी) आणि 120 (बी) आणि यूए (पी) कायद्याचे कलम 16, 18 आणि 20 नुसार अनुसूचित गुन्हे लावण्यात आले होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अॅक्ट, 2008 ने एफआयआर नोंदवला.

केवळ दहशत पसरवण्याच्या हेतूने कोल्हेंची हत्या

आरोपींचे कोल्हे यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नसून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अन्यत्रही असाच गुन्हा घडल्याचे एनआयएने म्हटले आहे. शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या हत्येचा संदर्भ एजन्सीने दिला. हा एक कट असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

हे सुद्धा वाचा

एनआयएकडून 13 ठिकाणी झडती

मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत. या सर्वांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. NIA ने बुधवारी या प्रकरणी 13 ठिकाणी झडती घेतली आणि द्वेष पसरवणारी पत्रके असलेली विविध आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. आरोपी आणि संशयितांच्या परिसरात घेतलेल्या झडतीदरम्यान, एनआयएने डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, सिम कार्ड, मेमरी कार्ड, डीव्हीआर), चाकू आणि इतर गुन्हेगारी कागदपत्रे आणि साहित्य जप्त केल्याचा दावा केला.

आरोपीच्या वकिलाने एनआयएचे आरोप फेटाळले

एका आरोपीची बाजू मांडणारे अधिवक्ता शरीफ शेख यांनी युक्तिवाद केला की, या गुन्ह्यात कोणत्या दहशतवादी संघटनेचा सहभाग आहे याचा उल्लेख फिर्यादी पक्षाने केलेला नाही आणि कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाही. दहशतवादविरोधी बेकायदेशीर क्रियाकल्प (प्रतिबंध) कायदा लागू करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही ते म्हणाले. आरोपींनी अमरावती पोलिसांच्या कोठडीत बराच वेळ घालवला असून, आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, असे वकिलाने सांगितले.

अमित शाहांनी तपास एनआयएकडे सोपवला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 1 जुलै रोजी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. अमित शहा यांच्या सूचनेनुसार गृह मंत्रालयाने (MHA) हे पत्र जारी केले आहे. एमएचए आदेशात म्हटले आहे की, “केंद्र सरकारचे मत आहे की राष्ट्रीय तपास संस्था कायदा, 2008 अंतर्गत अनुसूचित गुन्हा केला गेला आहे, गुन्ह्याच्या गंभीरतेच्या संदर्भात आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम लक्षात घेत NIA द्वारे तपास करणे आवश्यक आहे.” (The NIA FIR alleges that Umesh Kolhe was killed in Amravati to spread terror)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.