नाशिकमधील पुष्पा भाउचं पोलिसांना पुन्हा आवाहन, विभागीय आयुक्तांच्या बंगल्यातून पुन्हा तीच गोष्ट चोरली
पोलीस सुरक्षा असताना देखील पुन्हा चंदनाच्या झाडाचे खोड चोरून नेल्याने शासकीय निवस्थानाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

नाशिक : नाशिक शहर पोलिसांना एका नाशिकच्या पुष्पा भाऊनं थेट आव्हान दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अतिशय सुरक्षित असा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. यापूर्वी देखील याच शासकीय बंगल्यातून चोरी झाली होती. याशिवाय पोलीस अधिक्षक यांच्याही बंगल्यातून यापूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे थेट शासकीय अधिकाऱ्यांनाच नाशिकचा पुष्पा लक्ष करीत असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही महिन्यांपूर्वी देखील याच बंगल्यातून चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे समोर आले होते. बंगल्याच्या आत प्रवेश करून चंदनाच्या झाडाच खोड चोरांनी लंपास केले आहे. महसूल आयुक्तांच्या बंगल्याच्या समोर हाकेच्या अंतरावरच मुंबई नाका पोलीस चौकी आहे, नेहमी वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या ठिकाणाहून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस सुरक्षा असताना देखील पुन्हा चंदनाच्या झाडाचे खोड चोरून नेल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
महसूल आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी नाशिक शहरातील शासकीय पोलीस अधिक्षक यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती त्यामुळे थेट नाशिकमधील पुष्पा शासकीय अधिकाऱ्यांना लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
चंदन चोरीच्या घटना यापूर्वी देखील अनेक वेळेला नाशिक शहरात घडल्या आहेत, त्या दरम्यान शासकीय कार्यालय, शासकीय बंगले यांना हे चोरटे लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे थेट शहर पोलिसांना चंदन चोर आव्हान देत असल्याची चर्चा होत असून पोलीसांच्या कारवाईकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. नाशिकमधील हा पुष्पा शहर पोलीसांच्या हाती लागतो का याबाबत चर्चा सुरू आहे.
