AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यात आठ महिन्याच्या बाळाची काय चूक ? महिलेने घेतलेल्या निर्णयामुळे सगळंच झालं उद्धवस्त

राधिकाच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली आहे.

यात आठ महिन्याच्या बाळाची काय चूक ? महिलेने घेतलेल्या निर्णयामुळे सगळंच झालं उद्धवस्त
चहा पिताच चौघांचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2022 | 5:15 PM
Share

गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा : महिला अत्याचाराविरोधात कितीही कडक कायदे केले तरी महिलांवरील अत्याचार कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. विशेषतः हुंडाबळीच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडताना दिसताहेत. अशी एक बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. घरगुती अत्याचाराला (Domestic Violence) कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या (Women Suicide in Buldhana) करत आपले जीवन संपवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Mehkar Buldhana District) तालुक्यातील देऊळगावमाळी येथे ही घटना घडली आहे.

राधिका पवन खेत्रे असे मयत 22 वर्षीय विवाहितेचे नाव आहे. राधिकाच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली आहे.

सासरचे वारंवार करायचे पैशांची मागणी

राधिका खेत्रे हिचा विवाह पवन खेत्रे याच्याशी झाला होता. दोघांना आठ महिन्यांची मुलगीही आहे. विवाह झाल्यापासूनच पतीसह सासरचे लोक राधिकाचा मानसिक छळ करत होते. तसेच वारंवार माहेरुन पैशांची मागणी करत होते.

राधिकाच्या माहेरच्यांनी दोन-तीन वेळा सासरच्यांशी याबाबत चर्चाही केली. तसेच काही पैसेही त्यांना दिले होते. मात्र तरीही राधिकाच्या सासरच्या लोकांची पैशाची मागणी थांबतच नव्हती.

त्रासाला कंटाळून अखेर टोकाचे पाऊल उचलले

दररोज सासरकडील पती, सासू, सासरा हे लोक तिचा मानसिक छळ करीत असल्याने तो त्रास सहन होत नसल्याने राधिकाने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरातच आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली.

आईच्या मृत्यूमुळे आठ महिन्यांची मुलगी अनाथ

राधिकाला आठ महिन्यांची मुलगी असून आईच्या मृत्यूमुळे ही मुलगी अनाथ झाली आहे. राधिकाच्या मृत्यूने देऊळगावमाळी गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी मयत राधिकांच्या आईने मेहकर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत राधिकाचा पती पवनसह सासू, सासरे, जाऊ आणि दीर यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलीय.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.