AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून पोलिसांना मेसेज

मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता.

Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून पोलिसांना मेसेज
threat callImage Credit source: TV9
| Updated on: Feb 28, 2025 | 10:54 AM
Share

मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली .

शिंदेंनाही आली होती धमकी

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धमकी आली होती. त्यांची शासकीय गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. हा ईमेल मंत्रालय आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपासणी करून बुलढाण्यातील दोन तरुणांना अटक केली होती. मंगेश वायळ आणि अभय शिंगणे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही बुलढाण्याती देऊळगाव राजा येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली होती. धमकी देण्याचं कारण काय? त्यांच्या मागे आणखी कोणी आहे का? कुणाच्या सांगण्यावरून हा फोन केला का? आदी माहिती पोलीस घेत होते. ही घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती