स्पेशल बोगीतून प्रवास करत होते तरुण, टीटी म्हणाला येथून निघा, त्यानंतर जे घडले…

काही तरुण एका स्पेशल बोगीतून प्रवास करत होते. पण तेवढ्यात टीटी तिथे पोहोचले. त्यांनी अचानक या प्रवाशांना येथून निघून जाण्यास सांगितले.हे ऐकून त्या तरुणांनी असे काही केले की जीआरपीला हस्तक्षेप करावा लागला.

स्पेशल बोगीतून प्रवास करत होते तरुण, टीटी म्हणाला येथून निघा, त्यानंतर जे घडले...
१४ ऑगस्ट २०२५ पासून ही ऑफर सुरु होणार असून या योजनेचा प्रवास १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सुरु व्हायला पाहिजे तर परतीचा प्रवास हा १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान असायला हवा. रिटर्न तिकीटावरील सुट केवळ बेस फेअरवर मिळणार आहे. ही योजना खास करुन सणासुदीसाठी आहे.
| Updated on: Jul 26, 2025 | 4:26 PM

रेल्वे प्रवासात घडणारे गुन्हे हा देखील चिंतेचा विषय बनला आहे. प्रवासात प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरीला जाणे तर नेहमीचे बनले आहे. रेल्वेतून दारू आणि अंमलीपदार्थांची तस्करी देखील होत असते. आता कानपूर येथे घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे एका स्पेशल बोगीतून काही तरुण प्रवास करीत होते. तेव्हा तेथे टीटी तिकीट तपासण्यासाठी आले, तेव्हा टीटींनी त्यांना कोचच्या बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून तरुणांनी असे काही केले ही जीआरपी पोलिसांना धावतपळत यावे लागले. काय आहे नेमके प्रकरण पाहूयात..

कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर अचानक गोंधळ उडाला. जेव्हा प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी टीटी करीत होते. तेव्हा एका स्पेशल बोगीतून काही तरुण प्रवास करीत होते. तेव्हा टीटी तेथे पोहचले. टीटींनी या तरुणा तेथून जाण्यास सांगितले,तेव्हा या तरुणांनी टीटींना मारहाण करण्यास सुरुवात केली. मुझफ्फरपूर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. येथे तिघा टीटींना त्यांची ड्यूटी करताना मारहाण झाली.
तिकीट तपासणी करीत हे टीटी जेव्हा महिलांच्या डब्यात पोहचले तेव्हा तेथील तरुणांना नियमानुसार त्यांनी डब्याच्या खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा अचानक या तरुणांनी टीटींनाच चोपण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली आणि जीआरपी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

प्रवाशांनी टीटी अनिकेत घेरले आणि चोपले

टीटी अनिकेत जेव्हा महिलांच्या कोचमध्ये बसलेल्या पुरुष प्रवाशांना खाली उतरण्यास सांगत होते. तेव्हा प्रवाशांनी विरोध करती त्यांना घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींच्या अनुसार तिघा टीटींना तात्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरुन पसार झाले. अखेर एकाला कसेबसे पकण्यात यश आले त्याला पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे कानावर हात

या घटनेची खबर मिळताच जीआरपी घटनास्थळी पोहचली आणि तपास सुरु केला. एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु आङे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरु आहे. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत या प्रकरणा कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील वागणे बचावात्मक आहे.

नियमांचे पालन करणे बनले जोखीमीचे काम

या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे ? नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने टीटींना हिंसेचा सामना करावा लागला आहे हे खूपच चिंताजनक आहे.आता रेल्वे प्रशासन आणि जीआरपी या प्रकरणात किती कठोर कारवाई करते हे पाहावे लागेल.