AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षाच्या मुलीला गाडीत टाकून पळवून नेले, पोलिसांनी अवघ्या चार तासात केली अपहृत मुलीची सुटका

श्रीकांत शेवाळे याने मुलीला जबरदस्तीने उचलून कारमधे टाकून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत मुलीची आई मीनल यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देखील दिली.

तीन वर्षाच्या मुलीला गाडीत टाकून पळवून नेले, पोलिसांनी अवघ्या चार तासात केली अपहृत मुलीची सुटका
तीन वर्षाच्या अपहृत मुलीची चार तासात सुटकाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Dec 17, 2022 | 7:11 PM
Share

माढा : तालुक्यातील माढा येथे तीन वर्षाच्या मुलीला कारमध्ये टाकून पळवून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात अपहृत मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. श्रीकांत शेवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी श्रीकांतने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. माढा पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

मानेगाव येथून केले होते मुलीचे अपहरण

माढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेगाव (ता. माढा) येथे राहणाऱ्या मीनल अहिरे यांच्या तीन‌ वर्षाच्या मुलीचे मानेगाव येथील हॉटेल आरोही येथून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता अपहरण करण्यात आले. अहिरे या मूळच्या साक्री (जि. धुळे) येथील रहिवासी असून सध्या माढा येथे राहत आहेत.

श्रीकांत शेवाळे याने मुलीला जबरदस्तीने उचलून कारमधे टाकून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत मुलीची आई मीनल यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देखील दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली

माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी घटनेचे गांभीर्य ध्यानी घेऊन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र भापकर, संदीप निचळ, मेघा आगवणे यांचे एक पथक तयार केले.

या पथकाला सदर आरोपीबाबत अधिक माहिती घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे सदर पथकास आरोपीचा शोध घेऊन मुलीची त्वरित सुटका करण्याचे आदेश दिले. सदर पथकाला पोलीस नाईक रतन जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तांत्रिक माहिती तत्परतेने दिली.

तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले

आरोपी हा युसुफ वडगांव पोलीस ठाणे (ता.केज जि. बीड) यांच्या हददीतून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युसुफ वडगांव पोलिसांशी संपर्क साधत श्रीकांत शेवाळे यास गुन्हयात वापरलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले.

मुलीला सुखरुप आईकडे सोपवण्यात आले

अपहृत मुलीला माढ्यात आणून सुखरूपपणे तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. संशयित आरोपी श्रीकांत शेवाळे यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र भापकर करीत आहेत.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.