Kalyan Pothole : कल्याणमध्ये खड्यात पडून दोन वयोवृद्ध व्यक्ती जखमी, दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांचेही कंबरडे मोडले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होणे, खड्ड्यात पडून जखमी होणे अशा घटना घडत आहेत.

Kalyan Pothole : कल्याणमध्ये खड्यात पडून दोन वयोवृद्ध व्यक्ती जखमी, दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
आता खड्ड्याची तक्रार करा टोल फ्री नंबरवर
Image Credit source: Google
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 07, 2022 | 1:30 AM

कल्याण : खड्ड्या (Pothole)त पाणी भरल्याने अंदाज न आल्याने दोन वयोवृद्ध (Elderly) व्यक्ती त्यात पडून गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रविंद्र पै आणि गणेश सहस्त्रबुद्धे अशी या जखमी वृद्धांची नावे आहेत. कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात राहणार रविंद्र पै हे सकाळी चालण्यासाठी गेले होते. परत घरी येताना पाऊस सुरू झाला होता. टिळक चौक परिसरात रस्त्यात पावसाचे पाणी साचले होते. याच रस्त्यावरील एका खड्ड्यात त्यांचा पाय गेला आणि ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कल्याणमध्ये रस्स्त्यांवर खड्ड्यांची चाळण

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांचेही कंबरडे मोडले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होणे, खड्ड्यात पडून जखमी होणे अशा घटना घडत आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. महापालिका लोकांकडून टॅक्स घेते मात्र लोकांना सोयी कधी देणार ? लोकांनी किती भोगायचे ? असा सवाल जखमी रविंद्र पै यांनी केला आहे. कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी येथे राहणारे गणेश सहस्त्रबुद्धे हे सकाळी दुकानात दूध आणण्यासाठी गेले होते. यावेळी टिळक चौकातील खड्ड्यात पडून ते जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर देखील खाजगी रुग्णलायत उपचार सुरु आहेत.

घोडबंदर येथे खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

पाऊस सुरू असताना घोडबंदर रोड काजुपाडा येथे रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे झालेल्या अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. घोडबंदर रोड काजुपाडा या ठिकाणी ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एक मोटरसायकलस्वाराचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. दरम्यान त्याच्या मागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. (Two elderly persons were injured when they fell into a pothole in Kalyan)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें