Gondia Fruad : गोंदियात संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखांची अफरातफर, आणखी दोन आरोपींना अटक

सहाय्यक निबंधकाकडून फेर लेखापरीक्षण 2015 ते 2019 पर्यंतचे करण्यात आले. यात एकूण 58 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप समोर येताच विविध कलमांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनला एकूण 14 लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

Gondia Fruad : गोंदियात संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखांची अफरातफर, आणखी दोन आरोपींना अटक
गृहकर्ज मंजुर करुन घेत बँकेला गंडाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 12:08 AM

गोंदिया : गोंदियात संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखाची अफरातफर (Cheating) केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक (Arrest) केली आहे. याआधी पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या सात झाली आहे. नितेश बिसेन (44 रा. गोंदिया) आणि पंकज वंजारी (43 रा. गोंदिया) असे अटक करण्यात आरोपींची नावे असून दोघांनाही चार दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. आणखी या प्रकरणात काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पतसंस्थेतील एजंट आणि खातेदारांनी संस्थेतील अनियमिततेबाबत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी चौकशी झाली आणि ही अफरातफर उघडकीस आली.

लेखा परीक्षणात एकूण 58 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड

गोंदियात 2009 साली संत नरहरी पतसंस्था सुरू करण्यात आली होती. या संस्थेमध्ये नागरिकांनी आपली खाती उघडली आणि पैसे जमा केले. मात्र पतसंस्थेत अनेक अनियमिततेचे कारण व विड्रॉल देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने, या पतसंस्थेमध्ये असलेल्या एजंट व खातेदारांनी पतसंस्थेच्या संचालकांची तक्रार सहाय्यक निबंधकाकडे दिली. सहाय्यक निबंधकाकडून फेर लेखापरीक्षण 2015 ते 2019 पर्यंतचे करण्यात आले. यात एकूण 58 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप समोर येताच विविध कलमांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनला एकूण 14 लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी सुरुवातीला पाच लोकांना अटक केली. त्यानंतर 19 जुलै दोन संचालकांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले आहे. (Two more accused arrested in Gondiat Sant Narahari credit patsanstha in case of embezzlement of 58 lakhs)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.