परप्रांतीय कामगारांनी शाळकरी मुलींची छेड काढली, मुलींकडून चपलांचा प्रसाद, सिंधुदुर्गातील प्रकार

| Updated on: Oct 13, 2021 | 12:18 PM

सिंधुदुर्गात दोन परप्रांतीय कामगारांनी शाळकरी मुलींचा पाठलाग करून छेड काढल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. वेंगुर्ले-खवणे या परिसरात ही घटना घडली. हे दोन्ही परप्रांतीय कामगार आकाश फिश मिल कंपनीत काम करणारे असल्याची माहिती आहे.

परप्रांतीय कामगारांनी शाळकरी मुलींची छेड काढली, मुलींकडून चपलांचा प्रसाद, सिंधुदुर्गातील प्रकार
Sindhudurg Harrasment
Follow us on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात दोन परप्रांतीय कामगारांनी शाळकरी मुलींचा पाठलाग करून छेड काढल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. वेंगुर्ले-खवणे या परिसरात ही घटना घडली. हे दोन्ही परप्रांतीय कामगार आकाश फिश मिल कंपनीत काम करणारे असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं ?

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले-खवणे येथील आकाश फिश मिल कंपनीत काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींचा पाठलाग करुन त्यांची छेड काढल्याचा प्रकार घडला. या दोन परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुली काल (मंगळवारी) दुपारी शाळेतून येथून घरी जात असताना हा प्रकार घडला.

छेड काढल्याची माहिती गावातील नागरीकांना समजताच संतप्त गावकऱ्यांनी फिश मिल कंपनी परिसरात येऊन मुलींची छेड काढणाऱ्या त्या दोन परप्रांतीय कामगारांना चांगलाचं चोप दिला, लोकांनी त्या दोघांना चपलांचा प्रसाद दिला.

ही घटना निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्या परप्रांतीय कामगारांना कंपनीने कामा वरुन काढून टाकल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आणि येथील नागरीकांनी हे प्रकरण आपापसात मिटवले आहे.

पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून

पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलाय. तसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी इयत्ता आठवी वर्गामध्ये शिकत होती. सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं अमिताभ गुप्तांनी सांगितलं.

अल्पवयीन कबड्डीपटू विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

मुलगी कबड्डी खेळत असताना कोयता, चाकूने वार

मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती. यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते. दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला. तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.

संबंधित बातम्या :

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या प्रकरण, आरोपीला बेड्या, पोलीस आयुक्तांकडून खुनाचं कारण स्पष्ट

धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार; विनयभंग, अपहरणाची संख्या वाढली!