AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या प्रकरण, आरोपीला बेड्या, पोलीस आयुक्तांकडून खुनाचं कारण स्पष्ट

अल्पवयीन कबड्डीपटू विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता.

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या प्रकरण, आरोपीला बेड्या, पोलीस आयुक्तांकडून खुनाचं कारण स्पष्ट
पुण्यातील कबड्डीपटूच्या हत्येप्रकरणातील आरोपी (उजवीकडे)
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 10:28 AM
Share

पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीच्या हत्येनंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली. आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं अमिताभ गुप्तांनी सांगितलं.

अल्पवयीन कबड्डीपटू विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता.  आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली.

शीर धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न

आरोपी हा अत्यंत त्वेषाने अल्पवयीन मुलीकडे गेला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. त्यावेळी आरोपींनी मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या आरोपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.

पिस्तूल टाकून पोबारा

ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

भयंकर ! पुण्यात आठवीच्या मुलीची हत्या, तो वार करत होता तेव्हा लहान मुलं खेळत होती, मोठे घाबरुन पळाले

पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.