मोबाईलवरचा कॉल आणि पेटला वाद ! 6 फूट खड्ड्यातलं गुपित … त्या गावात काय घडलं ?

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मोबाईलवरून झालेल्या वादानंतर एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. अर्जुन नावाच्या पतीने खुशबूचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह घरामागे खड्डा खोदून पुरला. चार दिवसांनी वडिलांनी संशय व्यक्त केल्यावर हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे, ज्याने अवैध संबंधांच्या संशयातून हे कृत्य केल्याचे कबूल केले.

मोबाईलवरचा कॉल आणि पेटला वाद ! 6 फूट खड्ड्यातलं गुपित ... त्या गावात काय घडलं ?
क्राईम न्यूज
Image Credit source: social media
| Updated on: Dec 26, 2025 | 11:15 AM

नात्यांची शरम वाटेल असा एक खळबळजनक उत्तर प्रदेशात घडला आहे. मोबाईल फोनवरून झालेल्या वादानंतर एका तरूणाने त्याच्याच पत्नीची हत्या केली. एवढंच नव्हे तर घराच्या मागे असलेल्या रिकाम्या जागेत सुमारे सहा फूट खोल खड्डा खोदून पत्नीचा मृतदेहही त्यातच पुरला. तब्बल चार दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र अखेर सत्य समोर आलं आणि या खुनाचा उलगडा झालाच.

मोबाईलवरून वाद आणि गेला जीव..

खुनाची ही भयानक घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या बेलघाट ठाणे क्षेत्रातील बेइलीकुंड गावातील आहे. या गावातील 26 वर्षीय अर्जुनचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी खुशबूशी (वय 26) झाला होता. अर्जुन लुधियानामध्ये मजूर म्हणून काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच घरी परतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरच्या रात्री अर्जुन आणि खुशबू घरी एकटेच होते. तेव्हा खुशबूकडे मोबाईल फोन असल्याचे त्याला दिसलं आणि ती त्यावरून दुसऱ्या तरूणाशी बोलत असल्याचही आढळल्याने दोघांमध्ये वाद झाला.

जमीनीत खड्डा खोदून पुरला मृतदेह

भांडणाच्या वेळी अर्जुनने खुशबूचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत खड्डा खोदला आणि तिचा मृतदेह पुरला. खुशबू त्यांना न सांगता कुठेतरी निघून गेली आहे असं हत्येनंतर अर्जुनने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना सांगितलं. ते ऐकून तिच्या सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती कोणालाच सापडली नाही.

चार-पाच दिवस उलटूनही सुनेचा शोध न लागल्याने अर्जुनचे वडील श्याम नारायण यांना त्यांच्या मुलाने पत्नीच्या बेपत्ता होण्याबद्दल सांगितलेल्या कथेवर संशय आला. गुरुवारी सकाळी, ते बेलघाट पोलिस ठाण्यात गेला आणि त्यांनी त्यांच्याच मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. आपल्या मुलाने सुनेचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला. तक्रार मिळताच, पोलिसांनी कारवाई केली, घरी पोहोचून तपास सुरू केला. अर्जुनला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

बराच वेळ केली दिशाभूल पण ..

चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तो कधीकधी त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा आणि तिचा मृतदेह नदीत फेकल्याचा दावा करत असे आणि कधीकधी पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे.
दोन तास पोलिसांना इकडेतिकडे फिरवल्यांतर अखेर त्यांचा संयम संपला आणि त्याने हत्येची कबूली दिली.

आरोपीच्या निर्देशानुसार, पोलिसांनी घराच्या मागे उत्खनन केले, आणि तिथेच खुशबूचा मृतदेह सापडला. खुशबूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, अवैध संबंधांच्या संशयातून आणि मोबाईल फोनवरून झालेल्या वादातून ही हत्या झाली. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.