संपूर्ण शहर फिरवले, मग ताज हॉटेलमध्ये खोली बुक करून…; महिलेचे आमदारावर गंभीर आरोप

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. पहिले संपूर्ण शहर फिरवले, नंतर ताज हॉटेलमध्ये खोली बुक करून शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला असे महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

संपूर्ण शहर फिरवले, मग ताज हॉटेलमध्ये खोली बुक करून...; महिलेचे आमदारावर गंभीर आरोप
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 18, 2025 | 7:05 PM

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्षाचे आमदार भगवान शर्मा, ज्यांना सामान्यतः गुड्डू पंडित म्हणून ओळखले जाते, ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेची तक्रार बेंगलुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी आमदाराविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

प्रकरण काय आहे?

तक्रारकर्त्या महिलेने आरोप केला आहे की, आमदार भगवान शर्मा यांनी 14 ऑगस्ट रोजी तिला आणि तिच्या मुलाला बेंगलुरूला बोलावले. तिथे पोहोचल्यानंतर आमदार त्यांना अनेक ठिकाणी फिरवत राहिले आणि नंतर 16 ऑगस्ट रोजी त्यांना चित्रदुर्गला घेऊन गेले. उत्तर प्रदेशात परतण्यापूर्वी आमदाराने विमानतळाजवळील एका ताज हॉटेलमध्ये खोली बुक केली.

वाचा: भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख

हॉटेलमध्ये कथित प्रयत्न

या हॉटेलमध्येच आमदाराने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. महिलेने याला विरोध केला असता, आमदाराने तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. पीडितेचे म्हणणे आहे की, ती भयभीत झाली होती आणि कसेबसे तिथून निघून ती पोलिसांपर्यंत पोहोचली.

पोलिसांची कारवाई

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न (IPC 376/511) आणि गुन्हेगारी धमकी (IPC 506) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी आमदाराशी संबंधित तथ्यांची छाननी केली जात आहे. आमदार भगवान शर्मा यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. तसेच, त्यांच्या प्रतिनिधींनीही या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.