सासू-जावई लव्ह स्टोरीमध्ये दोन दिवसात होणार चक्रावून टाकणारा खुलासा, पोलिसांकडे महत्त्वाची माहिती

Saas-Damad Love Story : "याआधी सुद्धा तो दोन महिलांना घेऊन पळून गेला होता. नंतर परत आलेला. पण यावेळी तर त्याने होणाऱ्या सासूवर वाईट नजर ठेवली व तिलाच घेऊन पळाला" असं अपना देवीचा नवरा जितेंद्र म्हणाला.

सासू-जावई लव्ह स्टोरीमध्ये दोन दिवसात होणार चक्रावून टाकणारा खुलासा, पोलिसांकडे महत्त्वाची माहिती
Saas-Damad Love Story
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 16, 2025 | 11:06 AM

मागच्या आठवड्यभरापासून चर्चेत असलेल्या सासू-जावई लव्ह स्टोरी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील हे प्रकरण आहे. मुलीच लग्न लावण्याआधीच तिची आई म्हणजे सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेली. सासूसोबत पळून गेलेल्या जावयाचं लोकेशन आता पोलिसांना सापडलं आहे. पळून गेलेल्या महिलेचा पती जितेंद्रने या बद्दल माहिती दिली. आता लवकरच दोघांना पोलीस अटक करतील. फक्त एकदा तिला माझ्यासमोर घेऊन या, असं जितेंद्र म्हणाला. ‘तिचा निर्णय मी स्वत: करीन’

अपना देवीचा नवरा जितेंद्र म्हणाला की, दोघे बिहारमध्ये लपले आहेत. पोलीस लवकरच त्यांना अटक करतील. रडावलेल्या स्वराज जितेंद्र म्हणाला की, “आज आमच्या मुलीच लग्न होतं. पण माझ्या पत्नीच्या कृत्यामुळे कुटुंबातील सगळ्यांना शॉक बसला आहे. एकप्रकारे हे चांगलच झालं. कारण आम्हाला यामुळे होणारा जावई राहुलचे विचार समजले” “याआधी सुद्धा तो दोन महिलांना घेऊन पळून गेला होता. नंतर परत आलेला. पण यावेळी तर त्याने होणाऱ्या सासूवर वाईट नजर ठेवली व तिलाच घेऊन पळाला” असं अपना देवीचा नवरा जितेंद्र म्हणाला.

या दोघांमुळे माझी मुलगी आजारी

“या दोघांमुळे माझी मुलगी आजारी पडलीय. तिला धक्का बसला आहे. तिच्यावर आम्ही घरताच उपचार करतोय. माझ्या पत्नीनेच मुलीचा संसार बसण्याआधीच मोडला. पोलिसांनी दोघांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी” असं जितेंद्र म्हणाला.

राहुलने सासूला नाही, तर सासू राहुलला घेऊन पळाली

दुसरीकडे राहुलच्या गावातले सासूला दोष देतायत. त्यांच्यामते राहुल सभ्य आहे. पण सासूनेच त्याच्यावर जादूटोणा केलाय. त्यामुळे त्यांची पावलं भरकटली व तो सासूसोबत निघून गेला. राहुलने सासूला नाही, तर सासू राहुलला घेऊन पळाली. त्याला किडनॅप केलय असं राहुलच्या गावातल्या लोकांच म्हणणं आहे.

पोलिसांच्या किती टीम्स तपास करतायत?

सध्या पोलिसांची तीन पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिहार पोलिसांची टीम रवाना झाली आहे. दोघांना कधीपर्यंत अटक होते, ते लवकरच समजेल. सासू-जावयाची जोडी 6 एप्रिलला पळाली होती. 16 एप्रिलला राहुलच लग्न शिवानी बरोबर होणार होतं. पण त्याआधीच तो होणाऱ्या सासूसोबत पळून गेला.