नवरा-सासूसह चौघांना गुंगीचं औषध पाजलं, पाच लेकरांसह विवाहिता प्रियकरासह पळाली

नवरा-सासूसह चौघांना गुंगीचं औषध पाजलं, पाच लेकरांसह विवाहिता प्रियकरासह पळाली
विवाहिता प्रियकरासह पळाली
Image Credit source: टीव्ही 9

घरातील 45 वर्षीय महिलेने जेवण बनवून त्यात गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर सासू, पतीसह दोघां दिरांना देऊन ती पाच मुलांना घेऊन प्रियकरासह पळून गेली. या घटनेमुळे कुटुंबात खळबळ उडाली आहे.

अनिश बेंद्रे

|

May 17, 2022 | 9:13 AM

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका 45 वर्षीय महिलेने जेवणात गुंगीचे औषध मिसळून सासरच्या लोकांना दिले. यानंतर ही महिला तिच्या 5 मुलांना सोबत घेऊन प्रियकरासह (Boyfriend) पळून गेली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्ध सासूसह तिघा सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीच्या आधारे महिला आणि तिचा कथित प्रियकर रवींद्रचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्रेटर नोएडातील थाना डंकौर भागातील एका गावातील आहे. रविवारी सायंकाळी घरातील 45 वर्षीय महिलेने जेवण बनवून त्यात गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर सासू, पतीसह दोघां दिरांना दिल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

जेवल्यानंतर सर्व जण बेशुद्ध पडले. ही महिला आपल्या पाच मुलांसह गावातील रवींद्र नावाच्या प्रियकरासह पळून गेली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार कळला, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

वृद्धेसह चौघे बेशुद्ध

ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, 45 वर्षीय महिलेने जेवण बनवले आणि त्यात गुंगीचे पदार्थ मिसळून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातले. त्यानंतर सर्व जण झोपी गेले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून 70 वर्षीय वृद्ध महिलेसह चौघा जणांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर महिला आणि तिचा प्रियकर रवींद्र यांचा शोध सुरू आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें