VIDEO | कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण, असंवेदनशील पोलिसाचं निलंबन

| Updated on: Dec 10, 2021 | 2:28 PM

पोलिसाने केलेल्या मारहाणीची मिनिटभराची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर संबंधित व्यक्तीला काठीने मारहाण करत असल्याचं सुरुवातीला दिसतं. तर दुसरा पोलीस अधिकारी त्यांच्या कडेवर रडत असलेल्या चिमुरड्याला जबरदस्ती खेचून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे

VIDEO | कडेवर लेकरु घेतलेल्या बापाला काठीने मारहाण, असंवेदनशील पोलिसाचं निलंबन
उत्तर प्रदेशात पोलिसाची मारहाण
Follow us on

लखनौ : कडेवर लहान मूल असलेल्या व्यक्तीला पोलिसाने काठीने मारहाण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. उत्तर प्रदेशातील कानपूरच्या ग्रामीण भागात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसाच्या असंवेदनशीलतेवर टीकेचा भडिमार झाला. त्यानंतर संबंधित पोलिसाचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसाने केलेल्या मारहाणीची मिनिटभराची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील इन्स्पेक्टर संबंधित व्यक्तीला काठीने मारहाण करत असल्याचं सुरुवातीला दिसतं. तर दुसरा पोलीस अधिकारी त्यांच्या कडेवर रडत असलेल्या चिमुरड्याला जबरदस्ती खेचून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. कानपूरमधील अकबरपूरमधील जिल्हा रुग्णालय परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

बापाची गयावया

पोलिसांच्या मारापासून वाचत पळताना “लहान मुलाला लागेल” असं तो पिता ओरडताना ऐकू येतं. त्यानंतर लेकराला त्याच्यापासून दूर करण्यासाठी पोलीस पुन्हा त्याच्या मागे पळताना दिसतात आणि जबरदस्ती ओढतानाही दिसतात. त्यावेळी तो “याला आईही नाहीये” असं म्हणतो.

पोलिसांकडून उलटा दावा

धक्कादायक म्हणजे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समर्थन केलं. कमी बळाचा वापर करण्यात आला होता, त्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा दावा काही पोलिसांनी केला.

कानपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम चौरसिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, “काही लोक परिसरात अराजकता पसरवत होते, रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (OPD) बंद करून रुग्णांना घाबरवत होते.”

मारहाण झालेल्या व्यक्तीचा भाऊ हा अकबरपूर येथील जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी आहे. त्याने एका पोलिस निरीक्षकाचा हात चावला, तर कथित पीडिताने पोलिसांच्या कामात अडथळा आणला, असा दावाही चौरसियांनी केला आहे.

पोलिसाचं अखेर निलंबन

या घटनेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कानपूर ग्रामीण पोलिसांच्या ट्विटर हँडलने एक निवेदन जारी करत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित पोलिस निरीक्षकाला त्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बांधकामाच्या ठिकाणी वर्षभराच्या चिमुकलीला ठेवले, सिमेंटच्या ट्रकनं केला तिचा चेंदामेंदा!

मैत्रिणीला परीक्षेत मदत केल्याचा राग, तिघांचा तरुणावर चाकूहल्ला

कर्नाटकातून आलेल्या हल्लेखोराने का केला हल्ला? कारण सांगण्यास पोलिसांचा नकार, डॉ. राफे खून प्रकरण!