AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा गाढ झोपला, बायको भयंकर रागावली, उकळतं तेल घेऊन आली, त्यानंतर… पुढचं वाचून तुम्हीही किंचाळाल

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात पती-पत्नीच्या भांडणाचा हिंसक शेवट झाला. किरकोळ वादानंतर पत्नी रामावतीने रागाच्या भरात झोपलेल्या पती सज्जन पासीवर उकळते तेल ओतले. सज्जन गंभीर जखमी झाले आहेत आणि रामावती फरार आहे.

नवरा गाढ झोपला, बायको भयंकर रागावली, उकळतं तेल घेऊन आली, त्यानंतर... पुढचं वाचून तुम्हीही किंचाळाल
| Updated on: May 09, 2025 | 7:10 PM
Share

लग्न झाल्यावर पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरुन सातत्याने वाद विवाद होत असतात. मात्र उत्तर प्रदेशातील एका गावात पती-पत्नीच्या किरकोळ वादाला अचानक हिंसक वळण लागले. यानंतर पती गाढ झोपेत असताना पत्नीने रागाच्या भरात उकळते तेल अंगावर फेकल्याची घटना घडली आहे. यामुळे सज्जन पासी हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील सूरजपूर गावात सज्जन पासी (३०) हे त्यांची पत्नी रामावतीसोबत राहत होते. त्यांच्यात नेहमीच काही ना काही कारणाने वाद व्हायचे. बुधवारी (७ मे) संध्याकाळी सज्जन आणि रामावतीमध्ये बाचाबाची झाली. पण काही वेळानंतर त्यांच्यातील भांडण मिटली. प्रत्येक भांडणाप्रमाणे सर्व काही ठीक होईल असे सज्जन यांना वाटले आणि ते शांतपणे झोपण्यासाठी निघून गेले. रात्री जेवण झाल्यानतंर ते बेडरुम गाढ झोपेत असताना अचानक त्यांची पत्नी रामावती तिथे आली. तिच्या मनात अजूनही भांडणाचा राग होता.

रामावती तावातावात बेडरुममध्ये आली. तिने रागाच्या भरात सज्जनच्या अंगावर उकळते तेल ओतले. अचानक अंगावर तेल पडल्याने सज्जन वेदनेने किंचाळले. सज्जन यांच्या किंकाळ्या ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावत आले. त्यांनी तातडीने सज्जनला जवळच्या शिवगड येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले.

डॉक्टरांचे म्हणणं काय?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सज्जन हे या हल्ल्यात गंभीररित्या भाजले आहे. विशेषतः त्यांचा चेहरा आणि मान मोठ्या प्रमाणात भाजली आहे. ‘मला असं वाटलं होते की सर्व काही ठीक झाले आहे, पण मला काय माहित होते की तिचा राग अजूनही शांत झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सज्जन यांनी दिली.

सूरजपूर परिसरात एकच खळबळ 

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर सज्जन यांची पत्नी रामावती घरातून फरार झाली आहे. पोलिसांनी सज्जन पासी यांच्या तक्रारीवरून रामावती विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस स्टेशनचे अध्यक्ष विंध्य विनय यांनी दिली. या घटनेमुळे सूरजपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.