लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी बोलली अहो, डोळ्यांना लाईटचा त्रास होतोय, मग त्यानंतर जे घडलं त्याचं उत्तर अजूनही कोणाकडे नाही
लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची घटना असते. प्रत्येक जोडप्याने लग्नाची अनेक स्वप्न डोळ्यात साठवलेली असतात. एका लग्नसोहळ्यात विवाहाच्या पहिल्या रात्री जे घडलं. त्याने सगळेच चक्रावून गेले आहेत.

विवाह हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. लग्नाच्या आठवणी प्रत्येक जण आयुष्यभर मनात साठवून ठेवतो. पण एका जोडप्यासाठी लग्नाची पहिली रात्रच दु:खामध्ये बदलली. मोहसीन उर्फ मोनूची वरात खतौली येथे गेली होती. निकाहाचे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर मोनू पत्नीला घेऊन ऊंचापुरा येथील त्याच्या गावी आला. लग्नाची पहिली रात्र होती. नवरी मुलीला जास्त उजेडाचा त्रास होत होता. म्हणून तिने कमी प्रकाशाची इच्छा व्यक्त केली. छोट्या बल्बची तिने मागणी केली. जास्त उजेडामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतोय असं तिने सांगितलं. खोलीत छोटा बल्ब लावा. रात्री 12 च्या सुमारास मोहसीन उर्फ मोनू घराबाहेर पडला. पण पुन्हा तो घरी परतलाच नाही.
त्यामुळे घरातला निकाहच आनंद दु:खामध्ये बदलला. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेव अचानक गायब झाला. चार दिवस होऊन गेले. पण अजूनही कुटुंबीय आणि पोलिसांना मोनूबद्दल काही समजलेलं नाही. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. सरधना पोलीस ठाणे क्षेत्रातील मोहल्ला ऊंचापूर भागातील हे प्रकरण आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हे आहे.
दोन बहिणींचा निकाह होणार होता
कुटुंबियांना आधी वाटलं की, तो कुठल्या कामासाठी बाहेर गेला असेल. पण रात्री उशिरापर्यंत वाट पाहूनही तो परतला नाही. त्याचा शोध सुरु केला. रात्रभर शोध आणि लोकांकडे चौकशी केल्यानंतरही मोहसीनबद्दल काही समजलं नाही. त्याच्याच घरात त्याच्या दोन बहिणींचा निकाह होणार होता. जड अंतकरणाने भावाच्या अनुपस्थितीत ही लग्न लावून द्यावी लागली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहसीन शेवटचा गंगनहर जवळ जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी गंगनरमध्ये सर्च ऑपरेशनला गती दिली. पाणबुड्यांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला. त्याशिवाय आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं.
कुटुंबाला धक्का बसला
सरधना सीओ आशुतोष कुमार यांनी सांगितलं की, विभिन्न अंगांनी आम्ही तपास करत आहोत. पोलीस कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक शक्यता लक्षात घेऊन पुरावे गोळा केला जात आहेत. मोहसीनच्या अशा प्रकारे अचानक बेपत्ता होण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. आसपासच्या भागात या घटनेची चर्चा आहे.
