AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवेळी सिगारेटचे पैसे न देताच जायचे, यावेळेस मागितले तर थेट बंदूकच…

सिगारेटचे पैसे मागितले म्हणून काही टवाळखोरांनी असे कृत्य केलं जे पाहून दुकानदार हादरलाच. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, हे त्याच्याबाबतीत अगदी खरं ठरलं. पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना अटक केली असून इतर दोघे अद्याप फरार आहेत.

दरवेळी सिगारेटचे पैसे न देताच जायचे, यावेळेस मागितले तर थेट बंदूकच...
| Updated on: Oct 26, 2023 | 4:58 PM
Share

बरेली | 26 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये गुंडांचे, बदमाशांचे (crime) मनोबल खूपच उंचावले आहे. तेथे गुंडाचा अक्षरश: हैदोस सुरू आहे. एका शुल्लक कारणावरून त्यांनी दुकानदारावर बंदूकीतून थेट गोळी झाडल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचवेळी तो खाली वाकला आणि बचावला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण त्याच्याबाबतीत अगदी खरी ठरली. दुकानदार खाली वाकल्याने ती काच जवळच्याच कारची काच फोडून आत घुसली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चार आरोपींना अटक केली. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दुकानदार शिवम यादव हा मूळचा बिहारचा आहे. बरेलीमध्ये सुभाष चौक येथे तो पानाचे दुकान चालवतो. त्याच्या सांगण्यानुसार, गोळीबार करणारे आरोपी रोज त्याच्या दुकानात यायचे आणि सिगारेट मागायचे. मात्र त्याचे पैसे न देताच ते सर्व निघून जायचे. असं बरेच वेळा झालं अखेर दुकानदार शिवम याने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र या साध्याशा गोष्टीवरून ते चिडले आणि त्यापैकी एकाने खिशातून बंदूक काढून त्याच्यावर थेट गोळीच झाडली.

मात्र सुदैवाने त्याने प्रसंगावधान दाखवत डोकं खाली वाकवलं आणि ती गोळी त्याच्या शेजारी असलेल्या एका कारची काच फोडून आरपार केली. या घटनेनंतर हादरलेल्या दुकानदार शिवम याने 7 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लालू उर्फ ​​रॉक, ऋषभ ठाकूर, चुन्नू सौरभ आणि शंकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते नेकपूर येथील गोटिया येथील रहिवासी आहेत. मात्र अंकित यादव आणि आकाश असे उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?