AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मधुचंद्र, मग अचानक मध्यरात्री नवरी गायब….समोर आलं शेजाऱ्याच धक्कादायक कृत्य

दुसऱ्यादिवशी नवरीच सत्य सगळ्यांना समजलं. ते ऐकल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकरणात नवरी मुलगी मधुचंद्र साजरा केल्यानंतर अर्ध्यारात्री अचानक गायब झाली. 2 नोव्हेंबरला येथील एक घरात मुलगी लग्न करुन आली.

आधी मधुचंद्र, मग अचानक मध्यरात्री नवरी गायब....समोर आलं शेजाऱ्याच धक्कादायक कृत्य
Newly MarriedImage Credit source: File photo
| Updated on: Nov 05, 2024 | 1:42 PM
Share

लग्न म्हणजे आनंद. दोन कुटुंबांच आयुष्यभरासाठी एकत्र येणं. लग्नाच्या याच पवित्र कार्यात दोघांपैकी एकाने लपवा छपवी, फसवाफसवी केल्यास हाच आनंद दु:खात बदलतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात नवरी मुलगी मधुचंद्र साजरा केल्यानंतर अर्ध्यारात्री अचानक गायब झाली. मध्यरात्री नवऱ्याचे डोळे उघडल्यानंतर त्याला नवरी बिछान्यात दिसली नाही. त्याने नवरीला तिच्या नावाने आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नाही. रात्रभर नवरा नवरीला शोधत होता. पण काही समजलं नाही. दुसऱ्यादिवशी नवरीच सत्य सगळ्यांना समजलं. ते ऐकल्यानंतर नवरदेवाच्या पायाखालची जमिनच सरकली. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधील हे प्रकरण आहे.

दुसऱ्यादिवशी सकाळी समजलं की, नवरी मुलगी शेजाऱ्यासोबत पळून गेलीय. सध्या ती कुठे आहे? या बद्दल काहीही माहिती नाहीय. मुलीच्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबियांची मान शरमेने खाली झुकली. दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. जायस पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावच हे प्रकरण आहे. 2 नोव्हेंबरला येथील एक घरात मुलगी लग्न करुन आली. पण मधुचंद्र साजरा केल्यानंतर ती त्याच रात्री घरातून पैसे आणि दागिने घेऊन प्रियकरासोबत पळाली. नवरी मुलगी, तिचा प्रियकर आणि आणखी दोनजण असा चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘जावयाने आम्हाला मुलीच्या हरकतीबद्दल सांगितलं’

नवरी मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, “आमची मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलासोबत पळून गेली आहे. तिचं त्या मुलासोबत अफेयर होतं. आम्हाला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे 2 नोव्हेंबरला आम्ही जायस येथे राहणाऱ्या मुलासोबत मुलीचा निकाह लावून दिला” 3 नोव्हेंबरला जावयाने आम्हाला मुलीच्या हरकतीबद्दल सांगितलं. मुलीचा प्रियकर सुद्धा गायब असल्याच आम्हाला समजलं. त्यामुळे आमचा संशय खरा ठरला. पोलिसांनी नवरी मुलीच्या पित्याने केलेल्या तक्रारीच्या आधावर चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.