
पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची गोळी झाडून हत्या केली. बेला पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. पोलिसांनी एसओजी आणि सर्विलांसच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला तिर्वा रोज बॉर्डर बॅरियरजवळ अटक केली. उत्तर प्रदेश औरैया पोलिसांनी ही कारवाई केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर योगेन्द्र शाक्य उर्फ पप्पूला अटक केली. मी प्रियाच्या सांगण्यावरुन अरविंदची हत्या केली असं पोलीस चौकशीत योगेंद्रने सांगितलं. प्रिया आणि योगेंद्रने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेला तमंचा ताब्यात घेतला.
औरैयाच्या बेला पोलीस ठाण्याला 17 जानेवारीला पोलीस कंट्रोल रुमला हत्या झाल्याची सूचना मिळाली. मंडी रोड येथील एका घरात अज्ञाताने एका व्यक्तीची हत्या केली आहे. माहिती मिळताच बेला ठाण्याचे पोलीस फॉरेन्सिक टीम आणि अधिकाऱ्यांसाठी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी पथकं रवाना केली.
बॅग बनवायचं काम करायचा
बेला पोलीस, एसओजी आणि सर्विलांसच्या संयुक्त टीमने या प्रकरणात खुलासा करताना दोन आरोपींना पकडलं. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तमंचा 315 बोर, खोखा काडतूस आणि दोन मोबाइल फोन जप्त केले. पती अरविंद प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता. म्हणून पत्नी प्रियाने प्रियकर योगेंद्रच्या मदतीने घरातच गोळी मारुन पतीची हत्या केली. योगेंद्र बॅग बनवायचं काम करतो.
बॅग बनवता बनवता योगेंद्रचा प्रियासोबत रोमान्स सुरु झाला
मृत अरविंदची पत्नी प्रियाची वर्षभरापूर्वी बॅग बनवणाऱ्या योगेंद्र बरोबर ओळख झाली होती. बॅग बनवता बनवता योगेंद्रचा प्रियासोबत रोमान्स सुरु झाला. अरविंदला या बद्दल समजल्यानंतर त्याने विरोध केला. त्यानंतर प्रियाने एक कारस्थान रचलं. प्रियकर योगेंद्रच्या साथीने नवरा अरविंदला मार्गातून हटवलं. सध्या विवाहबाह्य संबंधातून समाजात गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता आणखी एक गुन्हा उघड झालाय.