लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन, तर कोर्टाकडून अटी-शर्तींसह जामीन

आठ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात अखेर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यानुसार वैशाली यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे.

लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन, तर कोर्टाकडून अटी-शर्तींसह जामीन
वैशाली वीर-झनकर, लाचखोरी प्रकरणात निलंबनाची कारवाई
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:17 PM

नाशिक : आठ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात अखेर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यानुसार वैशाली यांना दर सोमवारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे. वैशाली यांच्या वकिलांनी 14 ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती. याशिवाय ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता. (Nashik Education Officer Vaishali Veer-Zankar suspended in bribery case)

यापूर्वी वैशाली वीर-झनकर यांच्या विरोधात तीन वेळा निलंबनाचा प्रस्ताव पाठवून ही निलंबन होत नव्हतं. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होतं. मात्र या लाचखोर प्रकरणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी सूनवण्यात आल्यामुळे निलंबनाची करावाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव असल्याचं घटनेत नमूद असल्याचा आधार घेत हे निलंबन करण्यात आलं आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलं. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती.

इतर बातम्या :

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपची ‘जनआशीर्वाद’ नाही तर ‘जनअपमान यात्रा’, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला

मिलिंद नार्वेकरांनी अनधिकृत बंगला पाडला, गुन्हा का नाही? किरीट सोमय्यांचा सवाल

Nashik Education Officer Vaishali Veer-Zankar suspended in bribery case

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.