AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagwane: हगवणेला मदत करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या लेकाला अटक, काय आहे कनेक्शन?

वैष्णवी हगवणे प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसमधील आमदाराच्या लेकाचा देखील समावेश आहे. आता त्याचे नेमके कनेक्शन काय? चला जाणून घेऊया...

Vaishnavi Hagwane: हगवणेला मदत करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या लेकाला अटक, काय आहे कनेक्शन?
Vaishnavi HagavaneImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 27, 2025 | 1:16 PM
Share

हुंडाबळी वैष्णवी हगवणे प्रकरणारे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. या प्रकरणी रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी बावधन येथून एका आमदाराच्या मुलाला अटक केली आहे. पण या आमदाराच्या मुलाचे या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे जवळपास आठ दिवस फरार होते. त्यांनी या आठ दिवसात अनेक ठिकाणं बदलली तसेच गाड्याही बदलल्या. या दोन्ही आरोपींनी आश्रय दिलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आज या पाचही जणांना न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. यामधील एक आरोप काँग्रेस आमदाराचा लेक आहे. त्याने राजेंद्र आणि सुशील या दोन्ही आरोपींना लपण्यासाठी आश्रय दिला होता. वाचा: हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का

5 आरोपींना अटक

प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47) कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक. राहुल दशरथ जाधव (वय 45) पुसेगाव, खटाव, सातारा. अमोल विजय जाधव (वय 35) पुसेगाव, खटाव, सातारा. बंडू लक्ष्मण फटक (वय 55) लोणावळा. मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे, वय 60, वडगाव-मावळ.

आमदाराचा मुलगा कोण?

वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक करण्यात आरोपींमध्ये काँग्रेसचे आमदरा वीरकुमार पाटील यांचा मुलगा आह. गेल्या कार्यकाळापर्यंत काँग्रसचे आमदार होते. 28 वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे ऊर्जामंत्री देखील होते.

वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असताना त्यांना मदत करणाऱ्या पाच आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामध्ये कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याचाही समावेश असणार आहे. दुसरीकडे पोलीस कोठडी संपलेल्या सासू नणंद आणि पतीची पोलीस कोठडी ही वाढवून घेण्यात पोलिसांना यश आला आहे. वैष्णवीला तिने आत्महत्या केलेल्या दिवशी हे प्रचंड मारहाण करत 15 जखमा केल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला होता तो ग्राह्य धरण्यात आल्याने तिघांची पोलीस कोठडी वाढली आहे. तर कस्पटे कुटुंबीयांना धमकावणारा निलेश चव्हाण याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर