Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू, ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट! डॉक्टरांची मोठी माहिती, मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे?

Shiv sangram Vinayak mete passed away : विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात हा पहाटे साडेपाच वाजता नव्हे तर पाच वाजून पाच मिनिटांनी झाला होता, असंही म्हटलंय

Vinayak Mete Accident: विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू, ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट! डॉक्टरांची मोठी माहिती, मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे?
विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 8:52 AM

नवी मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed away) यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 52व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Highway) खोपोलीजवळ विनायक मेटे (Vinayak Mete Accident News) यांच्या झालेल्या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयच्या वरिष्ठ डॉक्टरांनी महत्त्वाची आणि मोठी माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावेळी त्याना तपासण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Video : मुख्यमंत्री शिंदे यांची विनायक मेटेंच्या निधनावर पहिली प्रतिक्रिया

हे सुद्धा वाचा

ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट

सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी ना पल्स, ना बिपी, ना हार्टबिट अशा गंभीर अवस्थेत ते आढळून आले होते. त्यामुळे तेव्हा त्यांना तपासण्यात आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे रुग्णालयात जेव्हा मेटे यांना आणण्यात आलं होतं, तेव्हा ते मृतावस्थेतच होते, अशी शंका आहे. दरम्यान, ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला होता का, यावर आता भाष्य करता येणार नाही, असंही डॉक्टरांनी म्हटलंय. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत सविस्तर बोलता असं, एमजीएम रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मृत्यूचं कारण नेमकं काय?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात हा पहाटे साडेपाच वाजता नव्हे तर पाच वाजून पाच मिनिटांनी झाला होता, असंही म्हटलंय. शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसाला गंभीर मार लागला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या पोलिसाच्या डोक्याला, छातीला आणि लिव्हरला अपघातात फटका बसलाय. जखमी पोलिसावर सध्या उपचार सुरु आहेत. तर गाडीचा चालक हा सुखरुप आहे. विनायक मेटे यांच्या डोक्याला मागच्या बाजूस मोठा मार बसला होता. त्याामुळे ब्रेनस्ट्रेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याचीही आशंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आता पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबात अधिक खुलासा होऊ शकेल, असंही वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटलंय. ते एमजीएम रुग्णालयात उपस्थित असलेल्या पत्रकारांशी विनायक मेटे यांची पाहणी केल्यानंतर बोलत होते.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.