
गुरुवारी दुपारी मुंबईत एक हादरवणारी घटना घडली. तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या एका बातमीने आणि हे कृत्य करणाऱ्या एका गुन्हेगाराच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावत ओलीस ठेवलेल्यांचा जीव वाचवणे हे सर्व एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. पण हे घडलं खरं. ज्यांची मुले या गुन्हेगाराने ओलीस ठेवली होती त्या पालकांचा काळजाचा ठोका चुकला होता. हा सर्व भयानक प्रकार घडला पवईती आरए स्टुडिओमध्ये.
आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांसह अशा 19 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.
आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांसह अशा 19 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या सर्वांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं नाव रोहित आर्या. त्याने या मुलांना ऑडिशनच्या नावाखाली या स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं. एवढंच नाही तर त्याने एक व्हिडीओ शूट केला होता. ज्यामध्ये त्याने या मुलांना ओलीस का ठेवलं आहे याचं कारण सांगितलं आहे. तसेच तो सांगताना दिसत आहे की त्याला काहीजणांशी बोलायचं आहे तसेच काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्याचं म्हटलं होतं.
19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा तो भयानक व्हिडीओ
या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे की, “मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आणि काही मुलांना ओलीस ठेवले. माझ्या फारशा मागण्या नाहीत, फक्त साध्या मागण्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे आणि काही प्रश्न विचारायचे आहेत, पण मला ही उत्तरे हवी आहेत. मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी पैसे मागत नाही. मला फक्त एक साधी चर्चा हवी आहे, म्हणूनच मी मुलांना ओलीस ठेवले आहे.”
A man identifying himself as Rohit Arya has released a video claiming to have taken around 15–20 children hostage inside a studio in Mumbai’s Powai area.
In the video, he demands to speak with specific people and threatens that if he isn’t allowed to meet them, he will set the… pic.twitter.com/cWgPSy0GBS
— Kumaon Jagran (@KumaonJagran) October 30, 2025
व्हिडीओतून दिली थेट धमकी
तसेच या व्हिडीओमध्ये त्याने पुढे म्हटलं, “तुमच्या एका चुकीच्या हालचालीमुळे मी संपूर्ण जागेला आग लावू शकतो आणि त्यातच मीपण मरेन. मी मेलो की नाही याने काही फरक पडत नाही पण , मुलांना दुखापत होईल. जर त्यांचे काही वाईट घडले तर मला माहित नाही. यासाठी मला जबाबदार धरले जाऊ नये, तर जे सामान्य माणूस फक्त बोलू इच्छित असताना हे सर्व अनावश्यकपणे भडकवत आहेत त्यांना जबाबदार धरले पाहिजे. माझे बोलणे संपल्यानंतर मी स्वतःहून बाहेर येईन. माझ्यासोबत इतर अनेकजण आहेत. मी बोलेन आणि उपाय सांगेन. कृपया मला अशा प्रकारे भडकवू नका की मी कोणालाही दुखावले.” असं म्हणत त्याने थेट धमकीच दिली होती.
बचाव कार्यादरम्यान पोलिसांना रोहित आर्याचा एन्काऊंटर करावा लागला
स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावरील ऑडिशन घेण्याच्या एका रुममध्ये त्याने या 17 मुलांना आणि इतर दोघांना ओलीस ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच सर्वत्र घबराट पसरली होती. पालकही चिंताग्रस्त होते. पालकांसह पोलिसांनीही स्टुडिओकडे धाव घेतली. पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि स्टुडिओला घेराव घातला. परिस्थिती लक्षात घेता अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात हाय अलर्ट जारी केला.
VIDEO | Mumbai: Police rescue over 20 children who were held hostage inside a flat in Powai area. The suspect, who identified himself as Rohit Arya has been arrested, as per the officials.
(Source: Third Party) pic.twitter.com/EsQRqDuISi
— Press Trust of India (@PTI_News) October 30, 2025
दरम्यान मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलांची सुटका केली. दरम्यान बचाव कार्यादरम्यान पोलिसांना रोहित आर्याचा एन्काऊंटर करावा लागला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.पोलिसांच्या सतर्कपणामुळे आणि घेतलेल्या अॅक्शनमुळे ओलीस ठेवणाऱ्यांचे प्राण वाचले.