माहेरुन पैसे आणण्यास नकार, पतीने पत्नीची नखे उपटली

मद्यधुंद पतीने पत्नीकडे पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने आधी आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही. आरोपीने महिलेच्या पायाच्या बोटाची नखे उपटून टाकली.

माहेरुन पैसे आणण्यास नकार, पतीने पत्नीची नखे उपटली
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 12:23 AM

हरियाणा : हरियाणातील फरीदाबादमध्ये अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीने माहेरुन पैसे (Money) आणण्यास नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण (Beating) करत तिच्या पायाची नखे (Nail) उपटल्याची धक्कादायक घटना फरीदाबादमधील धीरज नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पल्ला पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेश असे मारहाण करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

मद्यधुंद पतीने पत्नीकडे पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने आधी आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही. आरोपीने महिलेच्या पायाच्या बोटाची नखे उपटून टाकली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आरोपी पती हुंड्यासाठी नेहमी पत्नीला छळ करायचा

पीडितेची आई विमला देवी यांनी याबाबत सांगितले की, 13 वर्षांपूर्वी तिची मुलगी पूजा हिचा विवाह राजेशसोबत झाला होता. लग्नाच्या दोन वर्षानंतर राजेश आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करू लागला. राजेश अनेकदा पूजावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत असे. रविवारी रात्रीही असाच प्रकार घडल्याचे पीडित पूजा सांगितले. राजेश तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला.

महिलेचा आरडाओडा ऐकून शेजारी धावून आले

रविवारी रात्री राजेशने पत्नी पूजावर माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावर पूजाने माहेरून पैसे आणण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हताश झालेल्या राजेशने आधी तिला मारहाण केली आणि नंतर तिची नखे उपटून टाकली. यावेळी घरात आरडाओरडा एकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी पूजाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. (Wife beaten by husband for dowry in Haryana)