AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहागरात्रीच्या दिवशीच वधूने दिलं असं सरप्राईज; वराचं अख्ख कुटुंब हादरलं

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे, सुहागरात्रीच्या दिवशीच नवरीने आपल्या पतीला असं सरप्राईज दिलं ज्यामुळे वराचं अख्ख कुटुंब हादरलं आहे.

सुहागरात्रीच्या दिवशीच वधूने दिलं असं सरप्राईज; वराचं अख्ख कुटुंब हादरलं
Extramarital Affair
| Updated on: Jun 14, 2025 | 7:48 PM
Share

मध्य प्रदेशच्या राजगढमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे, सुहागरात्रीच्या दिवशीच नवरीने आपल्या पतीला असं सरप्राईज दिलं ज्यामुळे वराचं अख्ख कुटुंब हादरलं आहे. त्यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असंही काही घडू शकतं यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. नेमकं काय घडलं? काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

ही घटना उत्तर प्रदेशमधील बांकपूर गावमध्ये घडली आहे. बांकापूर गावचा रहिवासी असलेला रामगोपाल नावाच्या तरुणाचं लग्न अनेक वर्षांपासून होत नव्हतं. आपल्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून रामगोपालचं कुटुंब चिंतेत होतं. याचदरम्यान त्याच गावातील गोकुळ वर्मा नावाच्या व्यक्तीने रामगोपालच्या कुटुंबाला एका तरुणीचा फोटो दाखवला. रामगोपालच्या कुटुंबाला ही मुलगी आवडल्यानं ते देखील लग्नासाठी तयार झाले.

मात्र या घटनेत त्यानंतर मोठं ट्विस्ट आलं जेव्हा या तरुणीच्या वडिलांनी लग्नासाठी रामगोपालच्या कुटुंबाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर मुलाचं लग्नच जमत नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील आपले सर्व दागिने विकून दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर लग्न जमलं, एका मंदिरामध्ये त्या दोघांचं लग्न लावण्यात आलं. लग्नाचा विधी पूर्ण होताच मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपये दिले.

मात्र लग्न झाल्यानंतर जेव्हा वधूला तिच्या सासरी पाठवण्याची वेळ आली तेव्हा गोकूळ वर्मा आणि या मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, तिला बाथरूमला जायचं आहे. त्यानंतर सर्व जण आपल्या कामाला लागले, संधी मिळताच गोकूळ आणि या मुलीचे वडील तिला घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. बराचवेळ शोध घेऊन देखील ते तिघं न सापडल्यामुळे अखेर त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कुटुंबाला मोठा धक्का 

दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दोन लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले आहेत. या कुटुंबाची मोठी फसवणूक झाली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.