AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर… पत्नी जीवावर उठली, आमरसातून दिल्या झोपेच्या गोळ्या; नवरा आणि सासरच्यांना मारण्याचा कट?

आंबा किंवा आमरस हा बहुतांश लोकांचा वीक पॉईट. असह्य होणारा उन्हाळा, लोकांना आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे आंबे. पण हाच आमरस कोणाच्या जीवासाठी घातक ठरला तर ? एका महिलेने तिच्या पतीला आमरसामध्ये गुंगीच्या गोळ्या घालून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भयंकर... पत्नी जीवावर उठली, आमरसातून दिल्या झोपेच्या गोळ्या; नवरा आणि सासरच्यांना मारण्याचा कट?
| Updated on: May 30, 2024 | 12:20 PM
Share

आंबा किंवा आमरस हा बहुतांश लोकांचा वीक पॉईट. असह्य होणारा उन्हाळा, लोकांना आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे आंबे. पण हाच आमरस कोणाच्या जीवासाठी घातक ठरला तर ? एका महिलेने तिच्या पतीला आमरसामध्ये गुंगीच्या गोळ्या घालून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूर तालुक्यातील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या पत्नी, भाग्यवती चिनगुंडे हिच्याविरोधात नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

नेमकं काय झालं ?

फिर्यादी महेशकुमार चिनगुंडे हे तुळजापूर तालुक्यातील नांदगाव येथे राहतात. महेशकुमार यांना त्यांची पत्नी भाग्यवती यांनी 24 मे रोजी संध्याकाळच्या जेवणासाठी आमरस दिला. मात्र त्यांनी त्यामध्ये गुंगी येणाऱ्या, झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. या गोळ्यांचे सेवन केल्याने महेशकुमार यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, हे माहीत असतानादेखील भाग्यवती यांनी कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता किंवा डॉक्टरच्या परवानगीशिवाय त्या रसात झोपेच्या गोळ्या टाकल्या. हा आमरस महेशकुमार चिनगुंडे आणि त्यांच्या घरातील इतर लोकांनीही खाल्ला आणि त्यामुळे त्यांनाही गुंगी चढली. परिणामी ते दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोप लागली. तसेच झोपेतून उठल्यानंतरही त्यांना शरीरात वेदना जाणवत होत्या.

त्यामागील कारण समोर आले आणि खरा प्रकार जाणून घेतल्यानंतर पती महेशकुमार चिनगुंडे यांनी त्यांची पत्नी भाग्यवतीविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात भाग्यवती चिनगुंडे यांच्याविरुद्ध कलम 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यवती यांनी रसात गोळ्या का टाकल्या, पतीला आणि सासरच्या लोकांना तो रस का खायला दिला, त्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा पोलिस कसून तपास करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी