AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Raghuvanshi Murder : धक्कादायक, हनिमूनवर असताना पत्नीनेच का घडवली इंदूरच्या राजाची हत्या, कारण आलं समोर

Raja Raghuvanshi Murder : मागच्या काही दिवसांपासून इंदूरच्या राजाच्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीची निर्घृण हत्या झाली. त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. मृतदेहाच्या बाजूला एक सफेद शर्ट होता. पत्नी गायब होती. तिचा शोध लागत नव्हता. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे.

Raja Raghuvanshi Murder : धक्कादायक, हनिमूनवर असताना पत्नीनेच का घडवली इंदूरच्या राजाची हत्या, कारण आलं समोर
Wife Sonam Hatch conspiracy to Killed Raja Raghuvanshi
| Updated on: Jun 09, 2025 | 10:34 AM
Share

इंदूरच नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची हत्या आणि पत्नी सोनम रघुवंशीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील नंदगंजमध्ये एका ढाब्याजवळ सापडली. तिला ताब्यात घेण्यात आलय. सोनमनेच ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात दोन आरोपींना इंदूरमधून अटक करण्यात आली. एका आरोपी उत्तर प्रदेशचा राहणारा असून तो फरार आहे. लग्नानंतर मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेल्या या जोडप्यातील पती राजाची निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी सोनम बेपत्ता होती. राजाचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. या प्रकरणात सगळच संशयास्पद होतं. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पत्नी सोनमच या भयानक हत्याकांडामागे असल्याच स्पष्ट झालय.

सोनम रविवारी 3 ते 4 दरम्यान गाजीपूर नंदगंज येथे एका ढाब्याजवळ पोहोचली. ढाबे वाल्याच्या फोनवरुन भाऊ गोविंद रघुवंशीला व्हिडिओ कॉल केला. त्याला गाजीपूर येथे असल्याच सांगितलं. गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना कळवलं. त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला. ढाबेवाल्याने सुद्धा इमर्जन्सी नंबर 112 वर कॉल केला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं व वन स्टॉप सेंटर येथे ठेवलं.

राजाची हत्या करण्यामागच कारण काय?

पोलीस तपासात समोर आलं की, लग्नाआधी सोनमचे राज कुशवाह नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळेच तिने राजा रघुवंशीच्या हत्येची योजना बनवली. मेघालयच्या शिलॉन्ग येथे 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी गेले. राजा आणि सोनम 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील एका गावात होम स्टेसाठी थांबले. तिथून चेकआऊट केल्यानंतर दोघे बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरिम येथे बेवारस स्थितीत आढळली. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याने राजाची हत्या झाल्याच स्पष्ट झालं.

आणखी धक्कादायक खुलासे होतील

या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली होती. आतापर्यंत तीन आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होतील. कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घरवापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करत होते. या नव्या खुलाशाने सगळेच स्तब्ध झाले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.