राडा ! पत्नीने बंद दाराआड खोलीत परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं आणि…….

एका महिलेने बंद दाराआड एका खोलीत तिच्या पतीसह एका मुलीला पकडलं. त्यानंतर पतीने जे अनुभवलं त्याची देशभरात चर्चा आहे (Woman beat her husband after caught with another woman in room)

राडा ! पत्नीने बंद दाराआड खोलीत परस्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं आणि.......
फोटो प्रातिनिधिक (सौजन्य : सोशल मीडिया)

भोपाळ : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ किंवा ‘अग्गंबाई सूनबाई’ या ‘झी मराठी’च्या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेतील नटांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आपण बघितलं आहे. याशिवाय वास्तविक आयुष्यातही अनेकजण अशाप्रकारे विवाहबाह्य संबंध ठेवतात. अर्थात ते चूकच आहे. कारण तसं करुन आपण आपल्या जोडीदाराला फसवत असतो. मात्र, जोडीदार किंवा पत्नी जर जास्त खमकी असली तर अशा स्वरुपाचे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची काही खैर नसते. त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशच्या आगर मालवा येथील एका पुरुषाला आहे (Woman beat her husband after caught with another woman in room).

एका महिलेने बंद दाराआड एका खोलीत तिच्या पतीसह एका मुलीला पकडलं. त्यानंतर पतीने जे अनुभवलं त्याची देशभरात चर्चा आहे. खरंतर वरवर पाहता ही एक विनोदी घटना म्हणता येईल. मात्र, महिलेचा विश्वासघात केल्यानंतर तिला होणारा त्रास आणि त्यातून तिचा झालेला आक्रोश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा भल्याभल्यांची वाट लागू शकते हे या घटनेतून लक्षात येतं. त्यामुळे जोडीदाराला अजिबात फसवू नये, असा बोध या घटनेतून शिकायला मिळतो (Woman beat her husband after caught with another woman in room).

महिलेने आधी पोलीस, पत्रकार, नातेवाईकांना बोलावलं

काही ठरावीक कारणांमुळे आम्ही तुम्हाला संबंधित पतीचं आणि त्याच्या पत्नीचं नाव सांगू शकत नाहीत. पण ही घटना मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात घडलीय. महिलेचा पती एका दुसऱ्या मुलीसोबत एका खोलीत होता. याबाबत महिलेला माहिती मिळाली. तिने सर्वात आधी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिने पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतलं. त्याचबरोबर तिने पत्रकारांनाही बोलावून घेतलं. तसेच तिने आपल्या काही नातेवाईकांनाही बोलावलं.

पत्नीने पतीला चोपलं

सर्व घटनास्थळी जमल्यानंतर महिलेने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये तिच्या पतीचा कोन आहे? असा आवाज आला. तिने स्वत:चं नाव सांगितलं. पतीने दार उघडल्यानंतर त्याच्यासोबत इतर मुलगीही खोलीत होती हे उघड झालं. पती रंगेहाथ पकडला गेला. यावेळी तेथील स्थानिक पत्रकारांनी आणि इतर नागरिकांनी मोबाईलचा कॅमेरा सुरु केलेला होता. महिलेने वेळेचा विलंब न करता थेट स्वत:च्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा पती जीव वाचवून इकडेतिकडे पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र संतापलेली महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

पोलिसांची मध्यस्थी

विशेष म्हणजे हा सर्व गदारोळ पोलिसांच्या समोर घडत होता. महिलेने आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर ती पतीच्या प्रेयसीवरही सुटली. काही लोकांनी महिलेला अडवण्याचा देखील प्रयत्न केला. पण ती ऐकत नव्हती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलीस सर्वांना गाडीत भरुन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्यांनी महिलेची आणि पतीची समजूत घातली. त्यानंतर हे प्रकरण निवळलं.

हेही वाचा :

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, शरीरावर सिगारेटचे चटके, पीडिताच्या आईलाही मारहाण, आरोपीला बेड्या