VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल

हरिणायाच्या गुरुग्राम शहरात एका महिलेने कॅमेऱ्यासमोर आपल्या सासूच्या कानशिलात लगावली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय.

VIDEO : सूनेची सासूला मारहाण, कॅमेऱ्यासमोर कानशिलात, घरातला कलह सोशल मीडियावर व्हायरल


चंदिगड : सासू-सुनेचे वाद नेमक्या कोणत्या घरात नसतात? घर म्हटल्यावर माणसं आणि वाद हे आलेच. पण त्यातून आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावणे हा कुठला न्याय? हरिणायाच्या गुरुग्राम शहरात एका महिलेने कॅमेऱ्यासमोर आपल्या सासूच्या कानशिलात लगावली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय. या व्हिडीओतील सासू ही आधीपासूनच रडत होती. व्हिडीओत घरातील लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येतोय. या दरम्यान रागावलेली घरातील सून आपल्या पतीलाही धमकी देत सासूला मारहाण करते. संबंधित प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होतोय. महिलेच्या पतीनेच हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओतील सासूचं नाव अंशू जिंदल असं आहे. तर मारहाण करणाऱ्या सूनेचं कविता असं नाव आहे. वृद्ध महिला अंशू जिंदल यांना आता वयोमानानुसार घरातील कामे जमत नाहीत. त्यामुळे त्यांनी एका महिलेला घरकामासासाठी बोलावलं होतं. पण आपल्याला न विचारता घरकामासाठी महिलेला का बोलावलं? असा सवाल करत त्यांची सून कविता हिने वाद घालायला सुरुवात केली.

यावेळी घरात मोठा गदारोळ झाला. सासू अंशू रडायला लागल्या. कविताचा हा आक्रास्ताळ आणि माजखोरपणा लोकांसमोर यावा, यासाठी तिच्या पतीने मोबाईलवर तिचा व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर शेअर केला. संबंधित व्हिडीओत कविता आपल्या सूनेला कानशिलात लगावताना दिसत आहे.

व्हिडीओत सून नेमकं काय बोलते?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत महिला आपल्या पती आणि सासूला उद्देशून मारहाण करण्याची भाषा करते. “तू अशी मरणार नाही. तुझ्या अंगावर किडे पडतील. तू बकवास करु नकोस. मला तू मारलंय ना. तू मला मारलं आहेस हे लक्षात ठेव. हिला मारुन-मारुन भूत बनवून टाकेल. तू मला हात तर लाव”, असं कविता आपल्या पती आणि सासूला उद्देशन बोलते. यावेळी तिचा पती तिला अशा प्रकारचं वागणं योग्य नसल्याचं देखील समजावत असतो. पण ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

पीडित महिलेची पोलिसात तक्रार

या प्रकरणी पीडित सासूने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंशू यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अन्य ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तसेच त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर अनेकांकडून सूनेच्या वागणुकीवर निषेध व्यक्त केला जातोय.

व्हायरल होणारा व्हिडीओ बघा :

‘इन खबर’ या यूट्यूब चॅनलवर याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे :

हेही वाचा :

80 वर्षीय आजींचा मृतदेह गटारीत कुजलेल्या अवस्थेत, धुळ्यात एकच खळबळ

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

भरदिवसा दुपारी प्रसिद्ध महिला डॉक्टराच्या घरात शिरले, मानेला धारदार कोयता लावत दरोडा, सांगलीत भयानक थरार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI