
देशभरात अनेक ठिकाणी क्राईमच्या घटना घडल्याचे दिसत आहे. प्रियकरासाठी किंवा बदला घेण्यासाठी अनेकजण माणूसकी विसरुन जातात. निर्घृण हत्येची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे एका रस्त्याच्या शेजारी दोन भल्या मोठ्या काळ्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या पिशव्या पाहून गावकऱ्यांना संशय येऊ लागला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. त्यानंतर जे उघड झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
कर्नाटकमधील कोरतगेरे येथील कोलाला गावात एका महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेहाचे भाग अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्लास्टिकची पिशवी उघडताच जवानांचे होश उडाले. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
वाचा: 40 वर्षे भीक मागितली! पैसे मोजायला लागले 6 तास, एकूण रक्कम किती झाली हे ऐकून धक्काच बसेल
माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी रस्त्याने जाणाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सात प्लास्टिक पिशव्यांमध्ये महिलेच्या शरीराचे अवयव पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोरतगेरे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली आणि ८ ऑगस्ट रोजी आणखी सात पिशव्या जप्त केल्या, ज्यात उर्वरित अवयव आणि महिलेचे डोके सापडले. चौकशी टीममधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेची ओळख डोक्याच्या आधारे जवळपास निश्चित करण्यात आली आहे, परंतु अधिकृत पुष्टी अद्याप बाकी आहे.
चौकशीसाठी विशेष टीम
तुमकुरूचे पोलिस अधीक्षक अशोक केवी यांनी शुक्रवारी विशेष पथक गठीत करून कोलाला गाव आणि आसपासच्या भागात शोध घेण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कदाचित महिलेच्या हत्येच्या आरोपींनी कारने मृतदेहाचे तुकडे आणून फेकले असावेत आणि अशी शंका आहे की, पिशव्या चिम्पुगनहल्ली आणि वेंकटपुरा गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी विखुरलेल्या असू शकतात.
पोलिसांचा विश्वास आहे की, महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली आणि नंतर मृतदेह तुकड्यांमध्ये कापून येथे फेकण्यात आला. शनिवारी मुसळधार पावसामुळे उर्वरित भागांच्या शोधात अडचणी आल्या. प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि पोलिस हत्यारोप्यांची ओळख करण्यात व्यस्त आहेत. अद्याप हे कळले नाही की, महिलेची हत्या कोणत्या कारणाने करण्यात आली आणि या भयानक हत्याकांडाला अंजाम देणारे कोण आहेत.