
प्रवाशांना सुरक्षित प्रवास करवण्यासाठी RPF जवान स्टेशन आणि ट्रेनची सतत तपासणी करत असतात. याचा परिणामही पाहायला मिळतो. अशाच प्रकारच्या एका प्रकरणात पश्चिम बंगालच्या एका स्टेशनवर मॅडम टीनएजरसोबत चालत होती. चालतानाचा तिचा अंदाज पाहण्यासारखा होता. ते पाहून RPFच्या जवानांनी तिला थांबवले आणि चौकशी सुरू केली. टीनएजरशी नातं विचारले. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने जवानही चकीत झाला. त्यानंतर मग कडक चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले आणि महिलेला अटक करण्यात आली.
नेमकं काय झालं?
हावडा डिवीजनच्या बंडेल स्टेशनवर RPF जवानांचा कडक बंदोबस्त होता. ट्रेन येण्या-जाण्याच्या वेळी या बंदोबस्त वाढवला जात असे, जेणेकरून गुन्हेगार कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करतील आणि प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. याच अंतर्गत RPF जवान गस्त घालत होते. तेव्हा एक महिला टीनएजला घेऊन चालली होती. महिलेचे हावभाव संशयास्पद वाटले. याच आधारावर GRP जवानांनी तिला थांबवले. सुरुवातीला दुर्लक्ष करून ती महिला वेगाने पावले उचलून बाहेर पडण्याच्या तयारीत होती. महिला वेगाने बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात RPF ने पुन्हा थांबवले.
पोलिसांनी केली कारवाई
यानंतर चौकशी सुरू केली. तिने आपले नाव ममोनी सांगितले. RPF ने सोबत असलेल्या टीनएजरबद्दल विचारले तेव्हा तिने मुलगी असल्याचे म्हटले. यावर RPF ला शंका आली. कारण महिलेच्या वयानुसार मुलगी वाटत नव्हती. त्यांना काहीतरी बिनसले असल्याचे जाणावले. याच आधारावर आणखी चौकशी केली तर संपूर्ण प्रकरण समोर आले. खरे तर महिला टीनएजरला फूस लावून घेऊन जात होती. ती मानव तस्कर होती. आजूबाजूच्या गावातील भोळ्या-भाबड्या मुलींना फसवून तस्करी करत होती. महिलेवर मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून ताबडतोब प्रकरण GRP कडे सोपवले गेले.