शॉकिंग: ती प्राध्यापक, नवरा डॉक्टर, आधी तिनं नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर शॉक

मध्य प्रदेशच्या छतपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आलीय. एका सुशिक्षित पेशाने प्राध्यपिका असलेल्या महिलेने आपल्या डॉक्टर पतीची हत्या केली (Woman first gives sleeping peels after given electric Shock and killed his Husband in MP)

शॉकिंग: ती प्राध्यापक, नवरा डॉक्टर, आधी तिनं नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर शॉक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 11:31 PM

भोपाळ : मध्य प्रदेशच्या छतपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आलीय. एका सुशिक्षित पेशाने प्राध्यापिका असलेल्या महिलेने आपल्या डॉक्टर पतीची हत्या केली. या महिलेने आधी पतीच्या जेवणात झोपेचं औषध मिळवलं. त्यानंतर त्याला शॉक देवून त्याची हत्या केली. पती आपल्याला चुकीची औषधं देवून आजारात ढकलत असल्याचा संशय तिला होता. याच संशयातून तिने आपल्या पतीची हत्या केल्याचं कबूल केलंय (Woman first gives sleeping peels after given electric Shock and killed his Husband in MP).

पती-पत्नीत वारंवार वाद

आरोपी महिलेचं नाव ममता पाठक (वय 61) असं आहे. तर तिच्या मृतक पतीचं नाव डॉक्टर नीरज पाठक (वय 63) असं आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाद सुरु होता. पत्नीने 29 एप्रिलला नीरज यांच्या जेवणात झोपेचं औषध दिलं. त्यानंतर नीरज यांना इलेक्ट्रिक शॉक देवून हत्या केली.

हत्या करुन महिला झांसीला गेली

आरोपीची हत्या केल्यानंतर महिला झांसीला निघून गेला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 1 मे रोजी ती घरी आली. त्यानंतर तिने घरात पतीचा मृतदेह आढल्याची पोलिसात तक्रार केली. आपल्या पतीची हत्या करण्यात आलाचा दावा तिने तक्रारीत केला.

पोलिसांनी तपास कसा केला?

संबंधित घटना ही हाय प्रोफाईल असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरावले. पोलिसांनी सर्वात आधी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतक डॉक्टराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालात डॉक्टरांनी झोपेचे औषध घेतलं असल्याचं उघड झालं.

आरोपी पत्नीस बेड्या

डॉक्टरांचा मृत्यू होतो त्यादिवशी महिला घर सोडते. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसात तक्रार करते. त्यात शवविच्छेदन अहवालात झोपेचं औषध घेतल्याचं समोर येतं. या सगळ्या घटनाक्रमांमुळे पोलिसांचा मृतकाची पत्नी ममता पाठक हिच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. याप्रकरणी अजूनही पोलिसांकडून तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे (Woman first gives sleeping peels after given electric Shock and killed his Husband in MP).

हेही वाचा : ‘मी तुमच्या आईला पळवून नेलं’, दोन भावंडांकडून खिजवणाऱ्या इसमाची हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.