AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव रिक्षा अनियंत्रित झाली अन् वडापावच्या गाडीला धडकली, अपघातात गरम तेल अंगावर पडून महिला जखमी

रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी एक रिक्षा नियंत्रण सुटून थेट या वडापावच्या गाडीला येऊन धडकली.

भरधाव रिक्षा अनियंत्रित झाली अन् वडापावच्या गाडीला धडकली, अपघातात गरम तेल अंगावर पडून महिला जखमी
भरधाव रिक्षाची वडापावच्या गाडीला धडकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 09, 2023 | 6:40 PM
Share

बदलापूर : भरधाव रिक्षाने वडापावच्या गाडीला धडक दिल्याने रिक्षेसह वडापावची गाडीही उलटल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. यावेळी कढईतलं उकळतं तेल अंगावर पडल्यानं वडापाव विक्रेती महिला भाजली आहे. महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिमिता कांबळे असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोषी रिक्षाचालकाला बदलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बदलापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

अंबरनाथकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला अपघात

बदलापूरहून अंबरनाथकडे येणाऱ्या रस्त्यावर वेंकीज हॉटेलसमोर रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला. या ठिकाणी सिमिता कांबळे आणि त्यांची आई मंगला पोपटतुपे या रस्त्याच्या बाजूला वडापावची गाडी लावतात.

भरधाव रिक्षाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी एक रिक्षा नियंत्रण सुटून थेट या वडापावच्या गाडीला येऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती, की रिक्षासह वडापावची गाडीसुद्धा उलटली.

वडापावची गाडी उलटल्याने उकळते तेल अंगावर पडले

यावेळी कढईत असलेलं उकळतं तेल वडापाव विक्रेत्या सिमिता कांबळे यांच्या अंगावर पडलं आणि त्या भाजल्या. यानंतर त्यांना जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय.

रविवारी बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच बदलापूरहून अंबरनाथकडे येणारा रस्ता काहीसा मोकळा असल्यामुळे या भागात सहाजिकच वाहनांचा वेग वाढलेला असतो. मात्र काही वाहनचालक अतिशय बेदरकारपणे वाहन चालवत असल्यामुळे आजवर अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहेत.

याचाच आणखी एक प्रत्यय रविवारच्या अपघातात आला. यामध्ये वडापाव विक्रेत्या महिलेला मात्र नाहक दुखापतीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बदलापूर पूर्व पोलिसांनी अंबरनाथकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.