AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूनेच्या इज्जतीसाठी सासू धावली, स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसलं; रात्री साडेतीन वाजता असं काय घडलं ?

उकाड्यामुळे घराबाहेर अंगणात झोपणाऱ्या एका इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालं आहे...

सूनेच्या इज्जतीसाठी सासू धावली, स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसलं; रात्री साडेतीन वाजता असं काय घडलं ?
Updated on: Aug 25, 2023 | 11:59 AM
Share

बदायू | 25 ऑगस्ट 2023 : सासू-सुनेच्या कुरबुरींबाबत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण सुनेच्या मदतीसाठी सासूने आयुष्य पणाला लावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गरमीमुळे घराबाहेर अंगणात झोपणाऱ्या एका इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या (murder) करण्यात आल्याच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती.

मात्र या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या हत्येसाठी त्याच्या पत्नीलाच (woman arrested) अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त केले आहे.

उत्तर प्रदेशातील बदायूं येथे 14 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. तेजेंद्र सागर (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे समोप आले आहे. खरंतर तेजेंद्रची त्याच्या मुलाच्या बायकोवर, म्हणजेच त्याच्या सुनेवर वाईट नजर होती. हे तेजेंद्रच्या पत्नीच्या लक्षात आले होते. या वरून त्यांच्यात कितीतरी वेळा वादही झाले होते, पण तेजेंद्र काही सुधारला नाही. म्हणूनच त्याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत सुनेच्या इज्जतीसाठी स्वत:च्याच हाताने स्वत:चं कुंकू पुसलं.

पत्नीनेच केली पतीची हत्या

मिथिलेश असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. पण गेल्या वर्षभरापासून तिचा नवरा, तेजेंद्र याची सुनेवर वाईट नजर होती. त्यावरून त्या दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाले, मात्र तो काही सुधारला नाही. अखेर 14 ऑगस्टच्या रात्री ३ च्या सुमारासा ती भयानक घटना घडली.

बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला क्रमांक 8 मध्ये राहणारा तेजेंद्र हा वाढत्या उकाड्यामुळे घराबाहेर झोपला होता. रात्री तेजेंद्रचा कोणीतरी कुऱ्हाडीने शिरच्छेद केला. झोपेत असतानाच त्याची खून झाल्याची माहिती गावात पसरताच एकच हल्लाकोळ माजला. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरित तपास केला, त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली.

14 ऑगस्ट च्या रात्री नेमकं काय घडलं ?

खरंतर पोलीस तपासात मृत तेजेंद्रची पत्नी मिथिलेशचे नाव पुढे आले. तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. पती तेजेंद्र तिला रोज मारहाण करायचा आणि सुनेवर त्याची वाईट नजर होती. यामुळे वैतागलेल्या पत्नीने रात्री प्रथम कुऱ्हाडीला धार दिली आणि पहाटे तीन वाजेच्या सुमारास तेजेंद्र गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीचे अनेक वार करून त्याची हत्या केली. आरोपी महिलेने गुन्हा कबूल केला असून तिला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.