Yavatmal : अतिवृष्टीने हातचं पिक गेलं! यवतमाळध्ये शेतकऱ्याची विषप्राशन करत आत्महत्या

Farmer Suicide : शिंदे फडणवीस सरकारच्या 24 दिवसांच्या कार्यकाळात 80 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

Yavatmal : अतिवृष्टीने हातचं पिक गेलं! यवतमाळध्ये शेतकऱ्याची विषप्राशन करत आत्महत्या
शेतकरी आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 9:45 AM

यवतमाळ : राज्यातील शेतकरी आत्महत्येचा (Maharashtra Farmer Suicide) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यानं विष प्रशान करुन आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचं प्रचंड नुकसान झाल्यानं या हतबल शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. यवतमाळ (Yavatmal Farmer Suicide) जिल्ह्यातील मारेगाव (Morgaon Taluka) तालुक्यातील चोपण गावात ही धक्कादायक घटना घडली. विष प्रशान करत शेतकऱ्यांनी जीव दिला. गजानन उर्फ सुरेश खिरटकर असं मृत शेतकऱ्यांचं नावं आहे. या शेतकऱ्याची 9 एकर शेती होती. शेतातील पिक अतिवृष्टीमुळे पुरती झोपली होती. पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अखेर नैराश्यातून या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलंय.

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सरकारी घोषणा आणि सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत वास्तवात किती पोहोचली, यावरुनही अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. अशातच नव्या सरकारच्या अवघ्या काही दिवसांची आकडेवारी पाहता शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न महाराष्ट्र सरकार समोर आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या 24 दिवसांच्या कार्यकाळात 80 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तब्बल 89 शेतकऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या 24 दिवसांत आत्महत्या केली असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आलेली होती. दरम्यान, आता यात यवतमाळमधीलही आणखी एका शेतकऱ्याची भर पडलीय.

हे सुद्धा वाचा

विदर्भासोबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी आहेत. मराठवाडा विभागातील 54 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली होती. अशातच यवतमाळमधील आणकी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.

आतापर्यंत अधिकृत आकडेवारी काय?

शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील ताजी आकडेवारी पाहिल्या, कुठे किती आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत, त्यावर एक नजर टाकुया..

  • मराठवाडा 54
  • यवतमाळ 12
  • जळगाव 6
  • बुलडाणा 5
  • अमरावती 4
  • वाशिम 4
  • अकोला 3
  • चंद्रपूर 2
  • भंडारा 2
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.